Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणे हिट अँड रन: आरोपीची आई शिवानी अग्रवालला अटक; बदलेले ब्लड सॅम्पल कोणाचे?

by News Desk
June 1, 2024
in Pune, पुणे शहर
पुणे हिट अँड रन: आरोपीची आई शिवानी अग्रवालला अटक; बदलेले ब्लड सॅम्पल कोणाचे?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये आता महत्वाची अपडेट समोर आली आहे. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये बदल करण्यात आला. या आरोपाखाली आरोपीचे वडिल विशाल अग्रवाल आणि ससून रुग्णालयातील २ डॉक्टर डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरनोळ यांना अटक करण्यात आली आहे. यांनाच मुलाच्या आई शिवानी अग्रवालने देखील मदत केली असल्याचे आता समोर आले आहे. याच प्रकरणी आरोपी अल्पवयीन मुलाच्या आईला अटक करण्यात आली आहे. याबाबत पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे.

तिच्याकडे अपघाता संबंधी आणि रक्ताचे नमुने बदलण्यात आल्यासंबंधी चौकशी सुरू करण्यात आली आहे. तिला आज पहाटे राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी मुलाचे ससून रुग्णालयात रक्ताचे नमुने वैद्यकीय चाचणी दरम्यान बदलण्यात आले होते. यासोबतच अपघात घडला त्यावेळी गाडीमध्ये असलेल्या त्याच्या अन्य दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने देखील बदलण्यात आल्याचे सांगण्यात येते. ससून मधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी आलेल्या त्री-सदस्य समितीने दिलेल्या अहवालात या मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले आणि त्या जागी त्याच्या आईच्या रक्ताचे नमुने घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

Pune car accident case | Mother of the minor accused arrested in the case: Pune Police Commissioner Amitesh Kumar

(File photo)#Maharashtra pic.twitter.com/9U64dsGGxv

— ANI (@ANI) June 1, 2024

रक्ताचे नमुने बदलले असले तरी ते कुणाचे आहेत याचा शोध घेताना ते एका महिलेचे आहेत अशी माहिती समोर आली होती. त्याचवेळी मुलाच्या आईवर संशय आल्याने त्या दिशेने तपास सुरू झाला. या काळात मुलाची आई शिवानी अग्रवाल या बेपत्ता होत्या. त्यांचा शोध घेत अखेर पुणे पोलिसांनी अग्रवाल यांना अटक केली आहे. दरम्यान, शिवानी अग्रवाल यांना आजच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पोलीस आता तिच्याकडे या संदर्भात चौकशी करणार आहेत. तसेच बालन्याय मंडळाने पुणे पोलिसांना मुलाची चौकशी करण्यासाठी २ तासांची परवानगी दिलेली आहे. त्यामुळे पोलीस बालन्याय मंडळात या मुलाकडे चौकशी करणार आहेत. त्याच वेळी त्याच्या आईकडे देखील समोरासमोर चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

-एकच लक्ष्य ६५ हजार वृक्ष! चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प

-प्रांताधिकार्‍याचे आरोप, जिल्हाधिकारी दिवसेंनी सांगितलं सत्य; नेमकं प्रकरण काय?

-“‘हे’ उद्धव ठाकरेंनी दोन्ही मुलांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे”- नितेश राणे

-जिल्हाधिकारी दिवसेंविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रांताधिकाऱ्यांनी केली बदलीची मागणी

-रवींद्र धंगेकरांनी पुण्याला दिली उडता पंजाबची उपमा; म्हणाले, “उमलती फुले कोमजण्याचे काम…”

Tags: Blood Samplepune hit and runSassoon HospitalShivani AggarwalVishal Agarwalपुणे हिट अँड रनरक्त नमुनाविशाल अग्रवालशिवानी अग्रवालससून हॉस्पिटल
Previous Post

एकच लक्ष्य ६५ हजार वृक्ष! चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प

Next Post

पोर्शे कार प्रकरणी आमदार सुनील टिंगरेंचं नाव; अजित पवार म्हणाले, ‘त्यांच्यावर केलेले सर्व आरोप…’

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
पोर्शे कार प्रकरणी आमदार सुनील टिंगरेंचं नाव; अजित पवार म्हणाले, ‘त्यांच्यावर केलेले सर्व आरोप…’

पोर्शे कार प्रकरणी आमदार सुनील टिंगरेंचं नाव; अजित पवार म्हणाले, 'त्यांच्यावर केलेले सर्व आरोप...'

Recommended

शिंदे-अजित पवार गटात ठिणगी? ‘आम्ही विजय शिवतारेला औकाद दाखवू’, अजितदादांवरील टीकेला मिटकरींचं प्रत्युत्तर

शिंदे-अजित पवार गटात ठिणगी? ‘आम्ही विजय शिवतारेला औकाद दाखवू’, अजितदादांवरील टीकेला मिटकरींचं प्रत्युत्तर

March 13, 2024
Ajit Pawar And Deepak Mankar

अजित पवारांच्या भेटीनंतर मानकरांची नाराजी दूर; म्हणाले, ‘एकी ठेऊन आता विधानसभेला…’

October 18, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved