Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

जगताप दीर-भावजईच्या वादात लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थकाची उडी; म्हणाले, ‘मीच खरा उत्तराधिकारी’

by News Desk
July 16, 2024
in Pune, पिंपरी चिंचवड, राजकारण
Shankar Jagtap And Ashwini Jagtap
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पिंपरी चिंचवड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील जगताप या दीर-भावजईमध्ये वाद सुरु आहे. चिंचवड विधानसभेची उमेदवारीवरून विद्यमान आमदार अश्विनी जगताप आणि शहराध्यक्ष शंकर जगताप या दीर-भावजयांमध्ये लक्ष्मण जगतापांचा खरा उत्तराधिकारी कोण? यावरून वादविवाद सुरू आहे. हा वाद आणखी शमला नाही. तोच यामध्ये आणखी एकाने उडी घेतली आहे.

चिंचवडचे भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक शत्रुघ्न काटे यांची ओळख आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण जगताप यांची पत्नी आणि बंधू या दीर-भावजईमध्ये उत्तराधिकारी कोण यावरुन वाद सुरु असताना या वादात काटेंनी देखील उडी घेतली आहे.

You might also like

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

काय म्हणाले शत्रुघ्न काटे?

‘मी विधानसभा लढण्यावर ठाम आहे, असे म्हणत शत्रुघ्न काटे यांनी चिंचवडमध्ये बंडखोरी करण्याची तयारी दर्शवली आहे. काटेंनी समर्थकांसोबत बैठक घेऊन, याची घोषणा केली. आज लक्ष्मण भाऊ असते तर त्यांनी मलाच त्यांचे राजकीय उत्तराधिकारी बनवलं असतं’, असा दावा ही काटेंनी केला आहे.

आमच्या प्रभागाची मिटींग झाली त्या मिटींगमध्ये ठरले आहे. आगामी विधानसभेची निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहे. गेली १२ वर्षे भाजपचा कार्यकर्ता आहे. २ टर्म मी नगरसेवक राहिलो आहे. मी भाजपचे तिकिट मागत आहे आणि त्याच तिकिटावर मी लढवणार आहे. चिंचवड मतदारसंघात २००९ सालापासून लक्ष्मण जगतापांसोबत मी प्रचार प्रमुख, निवडणूक प्रमुख म्हणून काम केले आहे. मला या संपूर्ण मतदारसंघाची व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे मला असे वाटते की, आतापर्यंत मला दोनदा पक्षाने डावलले आहे पण आता मला डावलेल असे मला वाटत नाही’, असे म्हणत निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे शत्रुघ्न काटे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-बारामतीच्या राजकाणात मोठी घडामोड; काका-पुतणे येणार आमनेसामने, नेमकं काय प्रकरण?

-पुणेकरांसाठी आणखी एक ‘गुड न्यूज’; स्वारगेट मेट्रो स्थानकाचे काम पूर्णत्वास!

-शरद पवारांच्या मोदी बागेत सुनेत्रा पवारांची भेट; नेमकं कारण काय? राजकीय चर्चेला उधाण

-पर्वतीत ‘लाडकी बहिण योजने’साठी हजारो महिलांची नोंदणी; श्रीनाथ भीमालेंच्या नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

-श्री स्वामी समर्थ: ‘उगाची भितोसी भय हे पळू दे’; स्वामी समर्थ महाराजांच्या ‘या’ उपदेशाने बदलेल तुमचं आयुष्य

Tags: Ashwini JagtapAssembly ElectionchinchwadShankar JagtapShatrughna KateVidhan Sabha Electionअश्विनी जगतापचिंचवडविधानसभा निवडणूकशंकर जगतापशत्रुघ्न काटे
Previous Post

बारामतीच्या राजकाणात मोठी घडामोड; काका-पुतणे येणार आमनेसामने, नेमकं काय प्रकरण?

Next Post

एकदा संधी द्या! आमदार होऊनच दाखवतो, काँग्रेसच्या आबा बागुलांनी घेतली शरद पवारांची भेट

News Desk

Related Posts

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

by News Desk
August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

by News Desk
August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
Next Post
एकदा संधी द्या! आमदार होऊनच दाखवतो, काँग्रेसच्या आबा बागुलांनी घेतली शरद पवारांची भेट

एकदा संधी द्या! आमदार होऊनच दाखवतो, काँग्रेसच्या आबा बागुलांनी घेतली शरद पवारांची भेट

Recommended

Pune Palika

भावी नगरसेवकांनो कामाला लागा: राज्यात लवकरच उडणार पालिका निवडणुकांचा बार?

November 24, 2024
Sarang Sathaye

मनसेच्या इशाऱ्यानंतर भाडिपाचा पुण्यातील ‘तो’ शो रद्द; सारंग साठ्ये म्हणाला, ‘आगीत तेल…’

February 13, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved