Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home पुणे शहर

शरद पवारांचा धृतराष्ट्र झालाय! अजितदादांच्या महिला शिलेदाराची सडकून टीका

by Team Local Pune
April 12, 2024
in पुणे शहर, राजकारण
शरद पवारांचा धृतराष्ट्र झालाय! अजितदादांच्या महिला शिलेदाराची सडकून टीका

xr:d:DAF9VbwAIMM:45,j:1665630564760188486,t:24041204

585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघात पवार काका पुतण्यामध्ये सुरू असणारा राजकीय संघर्ष आणखीन वाढताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी बारामतीमध्ये बोलत असताना “बारामतीकरांनी साहेबांना निवडून दिलं, लेकीला निवडून दिलं आता सुनेला निवडून द्यावं, बारामतीकर हे कायम पवार नावाच्या पाठीमागे उभे राहतात” असे विधान केलं होत. अजितदादांच्या या विधानाचा समाचार घेत ‘मूळचे पवार आणि बाहेरून आलेल्या पवारांमध्ये फरक आहे’ म्हणत शरद पवारांनी सुप्रिया सुळे या मूळ तर सुनेत्रा पवार या विवाहानंतर पवार झाल्याचे अप्रत्यक्षरीत्या दर्शवण्याचा प्रयत्न केला. शरद पवारांच्या विधानावर आता अजित पवार गट चांगलाच आक्रमक झाल्याचं दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या फायर ब्रँड महिला नेत्या रूपाली पाटील यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका करतानाच त्यांचा धृतराष्ट्र झाला असल्याचं म्हटलं आहे. “सासरी नांदायला आलेली सून परक्या ठिकाणाशी जन्मोजन्मीचे नाते जोडते. ते काही सहजपणे शक्य होत नाही. त्यासाठी सासरी नांदायला आलेल्या त्या मुलीच्या आतड्याला कितीदा पीळ पडतो, माहेरच्या आठवणीने जीव किती तीळ तीळ तुटतो, कितीदा ती अश्रू ढाळते हे सासरी नांदायला आलेल्या मुलीला आणि तिला नांदायला पाठवणाऱ्या बापलाच कळू शकेल.अन्य कोणालाही नाही. शरद पवार साहेब यांच्यासारख्या स्वतःची विशिष्ट प्रतिमा निर्माण करण्यात हयात घालवलेल्या नेत्याने मात्र तमाम सासुरवाशीनींचा हा त्याग मातीमोल ठरवला आहे” अशी टीका पाटील यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केली आहे.

You might also like

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

रुपाली पाटील यांची फेसबुक पोस्ट नेमकी काय?

सासरी नांदायला आलेली सून परक्या ठिकाणाशी जन्मोजन्मीचे नाते जोडते. ते काही सहजपणे शक्य होत नाही. त्यासाठी सासरी नांदायला आलेल्या त्या मुलीच्या आतड्याला कितीदा पीळ पडतो, माहेरच्या आठवणीने जीव किती तीळ तीळ तुटतो, कितीदा ती अश्रू ढाळते हे सासरी नांदायला आलेल्या मुलीला आणि तिला नांदायला पाठवणाऱ्या बापलाच कळू शकेल.अन्य कोणालाही नाही.

शरद पवार साहेब यांच्यासारख्या स्वतःची विशिष्ट प्रतिमा निर्माण करण्यात हयात घालवलेल्या नेत्याने मात्र तमाम सासुरवाशीनींचा हा त्याग मातीमोल ठरवला आहे.सून बाहेरची असते अशा निर्देशाचे संतापजनक वक्तव्य करून तथाकथित पुरुषी मानसिकतेचे दर्शन घडवले आहे. त्यातून त्यांचेही पाय मातीचेच हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

राजकारणात स्वतःची पुरोगामी प्रतिमा निर्माण करन्यासाठी स्वतःभोवती कायम एक प्रभावळ मिरवणाऱ्या शरद पवार साहेब यांनी स्वतःच स्वतःच्या कथनी करनीतून त्या विचारांच्या यापूर्वीही अनेकदा चिंधड्या उडवल्या आहेत. मग ते राजू शेट्टींची जात काढणे असो, भाजपाने छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर खासदार म्हणून संधी दिल्यानंतर छत्रपतींच्या गादीला कमी लेखनारे अवमानजनक वक्तव्य असो, स्व. प्रभा राव या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा असताना या ज्येष्ठ महिला नेत्याबद्दल, ” माणसं म्हातारी झाली की कावल्यागत करतात” हे वक्तव्य असो, की ज्येष्ठ नेते माजी मंत्री दादा जाधवराव ६९ वर्षांचे असताना त्यांच्याबद्दल तसेच स्व. सदाशिवराव मंडलिक या एकेकाळच्या स्वतःच्याच सहकाऱ्याबद्दल बोलताना “बैल म्हातारा झालाय त्याला बाजार दाखवा” असे कसाई धार्जिणे केलेले वक्तव्य असो. यातून कोणता विचार त्यांनी जपला?

एका जाहीर सभेत तर त्यांनी तृतीपंथीयांची चक्क अक्टिंग करून त्यांना देखील कमी लेखत मारलेली स्टाईल कुठल्या समतेच्या विचारधारेत बसते? त्यांच्याही लेखी हा वर्ग थट्टेचा विषय असेल तर त्यांची खरी मानसिकता काय आहे? हे दिसून आले.

सून परकी, बाहेरची अशा आशयाचे त्यांचे वक्तव्य म्हणजे शरद पवार यांचाही धृतराष्ट्र झाला आहे, हेच सिद्ध होते. कन्या प्रेमाने त्यांनी जणू स्वतःच्या डोळ्यावर पट्टीच बांधली आहे. या आंधळ्या प्रेमात मात्र त्यांनी आई, पत्नी आणि तमाम सासुरवाशींच्या, त्यागाला, त्यांनी जीव जाळून आणि मान मोडून सासरी राबत पार पाडलेल्या कर्तव्याला मातीमोल ठरवून स्वतःचेही पाय मातीचे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

जाता जाता एक विषय. शरद पवार साहेब यांनी स्वतःचीच सून असणाऱ्या सौ. सुनेत्रा पवार यांना नजरेसमोर ठेवून तमाम सासुरवाशीनींना परकं, बाहेरचं अगदी ग्रामीण भाषेत सांगायचं म्हटलं तर उतावडं ठरवलं आहे. मात्र त्या सुनेत्रा पवार यांच्या माहेरची मुळं बारामतीच्याच मातीत आहेत. त्या अर्थाने त्यांचं माहेरही बारामती आणि सासरही बारामती. वास्तविक अशा गोष्टींची कधी राजकारणात चर्चा करायची नसते. पण तमाम महिलांचा अवमान होत असताना काही गोष्टी निदर्शनास आणून देणं आवश्यक असतं. अन्यथा आजपर्यंत खूप काही सोसलेल्या, पिचलेल्या सासुरवाशीनींचे कर्तुत्व, कर्तव्य अशा एका वक्तव्याने हकनाक निकालात निघेल.

सासरसाठी प्रसंगी प्राण अर्पण करणाऱ्या, सासरचा मान मरातब जपण्यासाठी माहेरला कायमचे, तोडणाऱ्या सासुरवाशीनींची परंपरा पवार साहेब विसरले आहेत. हे वयानुरूप झालेले विस्मरण, की त्यांचा पुरुषी मानसिकतेचा खरा चेहरा? पोटच्या लेकीच्या आंधळ्या प्रेमापोटी , लेकी समान सुनांना, शरद पवार साहेबांनी प्रचंड दुखावलेच, वेदनादायक वक्तव्य आहे.

त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध.

Tags: ajit pawarbaramati loksabhasharad pawarSunetra Pawarअजित पवारखासदार सुप्रिया सुळेशरद पवारसुनेत्रा पवार
Previous Post

Baramati Lok Sabha | ‘मूळचा पवार आणि बाहेरुन आलेला पवार…’; अजितदादांना काकांचं खुमासदार शैलीत

Next Post

पक्षांतर्गत कुरघोड्यांनी धंगेकर हैराण, लोकसभेचा प्रचार राहिला बाजूला; वाद मिटवण्यासाठी काँग्रेसची कसरत

Team Local Pune

Related Posts

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Next Post
Ravindra Dhangekar

पक्षांतर्गत कुरघोड्यांनी धंगेकर हैराण, लोकसभेचा प्रचार राहिला बाजूला; वाद मिटवण्यासाठी काँग्रेसची कसरत

Recommended

पुण्यात इतकं ड्रग्ज सापडतंय याला गृहमंत्रीच जबाबदार; अमित ठाकरेंची फडणवीसांवर टीका

पुण्यात इतकं ड्रग्ज सापडतंय याला गृहमंत्रीच जबाबदार; अमित ठाकरेंची फडणवीसांवर टीका

February 23, 2024
समान पाणीपुरवठ्याचा शब्द पाळला! आता मुळशी धरणातून पाण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार – मोहोळ

समान पाणीपुरवठ्याचा शब्द पाळला! आता मुळशी धरणातून पाण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार – मोहोळ

April 28, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved