Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पक्षांतर्गत कुरघोड्यांनी धंगेकर हैराण, लोकसभेचा प्रचार राहिला बाजूला; वाद मिटवण्यासाठी काँग्रेसची कसरत

by News Desk
April 13, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
Ravindra Dhangekar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातून महायुती आणि महाविकास आघाडीकडून आपले उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजप आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. याच्या उलट चित्र काँग्रेसमध्ये पाहायला मिळत असून पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे धंगेकर मात्र हैराण झाल्याच दिसत आहे. आधी उमेदवारी देण्यावरून काँग्रेसमध्ये उफाळून आलेली नाराजीची लाट, त्यानंतर मेळाव्यावेळी रंगलेले नाराजी नाट्य आणि आता पद वाटपावरून सुरू असलेला राडा, या सर्व घडामोडींमुळे उमेदवाराचा प्रचार बाजूलाच राहिला असून पक्षातले वाद मिटवण्यावरच काँग्रेसला कसरत करावी लागत असल्याच दिसत आहे.

पुणे लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. सर्वांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. महायुतीचे मोहोळ यांच्या प्रचाराने गती घेतली आहे. महाविकास आघाडीतील आणि कॉंग्रेस पक्षांतर्गत सुंदोपसुंदीने धंगेकरांना ग्रासले आहे. नुकत्याच कॉंग्रेस भवन येथे झालेल्या बैठकीमध्ये सर्वांनी एकदिलाने काम करून रवींद्र धंगेकर यांना निवडून आणण्याच्या आणाभाका घेतल्या. परंतु त्यानंतर दोनच दिवसांत पक्षांतर्गत या कुरघोड्यांची कॉंग्रेस आणि राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

You might also like

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

झाले असे की, गेल्या तीन वर्षांपासून कॉंग्रेस पक्षाच्या ओबीसी आघाडीचे पुणे शहराध्यक्ष असलेले प्रशांत सुरसे यांची बुधवारी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शहर व प्रदेश पातळीच्या शिफारसीवरून हकालपट्टी केली गेली आणि त्यांच्या जागेवर प्रदीप परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, सुरसे यांच्या गटाने थेट दिल्लीतील कॉंग्रेसच्या अखिल भारतीय ओबीसी विभागाचे सरचिटणीस राहुल यादव यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने आदेश काढून सुरसे यांची या पदावर पुनर्नियुक्ति केली.

काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या आलेल्या बैठकीत कसबा विधानसभा शिवसेनेला सोडणार, असा शब्द द्या, तरच धंगेकरांचा प्रचार करू अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाने घेतली होती. मध्यंतरी केसरीवाडा येथे झालेल्या बैठकीमध्ये ‘ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार दिला, तेच आता मोदीविरोधक म्हणून आमच्याशेजारी बसणार असतील, तर आम्हाला हे मान्य नाही,’ असे सांगून काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने काढता पाय घेतला होता. तर त्यानंतर झालेल्या बैठकीसाठी लावलेल्या बॅनरवर ‘नेत्याचा’ फोटो टाकला नाही, म्हणून मंडपवाल्याला मारहाण करण्यात आल्याचं समोर आलं होतं. दोन दिवसांपूर्वी धंगेकरांचा प्रचार करू नका, अशा सूचना शिवसेना ठाकरे गटाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिल्या होत्या. त्यानंतर पुणे लोकसभा महाविकास आघाडीचे काम जोमाने सुरू आहे. शिवसेना प्रचारामध्ये सहभागी आहे, असे जाहीर करण्याची नामुष्की शिवसेना ठाकरे गटाच्या शहराध्यक्षांवर ओढवली होती.

महत्वाच्या बातम्या-

-Baramati Lok Sabha | ‘मूळचा पवार आणि बाहेरुन आलेला पवार…’; अजितदादांना काकांचं खुमासदार शैलीत

-शरद पवारांचा धृतराष्ट्र झालाय! अजितदादांच्या महिला शिलेदाराची सडकून टीका

-एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका; म्हणाले, “मोदींनी वक्रदृष्टी केल्यास फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना….”

-“मोहोळ रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होतील, स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारा टिकणार नाही”- मुख्यमंत्री शिंदे

-“निवडणुकीतून माघार घेण्याची मानसिकता नव्हती, मनाला मुरड घालत माघार घेतलीय”; सासवडमध्ये शिवतारेंचं वक्तव्य

Tags: bjpCongressLok Sabha ElectionpuneRavindra Dhangekarकाँग्रेसपुणेभाजपरवींद्र धंगेकरलोकसभा निवडणूक
Previous Post

शरद पवारांचा धृतराष्ट्र झालाय! अजितदादांच्या महिला शिलेदाराची सडकून टीका

Next Post

“स्वत:च्या खासदारकीची पर्वा न करता मोदींना पाठिंबा देणाऱ्या बारणेंना विक्रमी मताधिक्याने संसदेत पाठवूया”- प्रशांत ठाकूर

News Desk

Related Posts

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

by News Desk
July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
Next Post
“स्वत:च्या खासदारकीची पर्वा न करता मोदींना पाठिंबा देणाऱ्या बारणेंना विक्रमी मताधिक्याने संसदेत पाठवूया”- प्रशांत ठाकूर

"स्वत:च्या खासदारकीची पर्वा न करता मोदींना पाठिंबा देणाऱ्या बारणेंना विक्रमी मताधिक्याने संसदेत पाठवूया"- प्रशांत ठाकूर

Recommended

Ajit Pawar

कथित जमीन व्यवहार प्रकरणी मोठी अपटेड: पार्थ पवारांना जमीन विकणारी ‘ती’ महिला नेमकी कोण?

November 7, 2025
Chaitnya Maharaj Wadekar

प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराजांना अटक; नेमकं कारण काय?

October 3, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved