Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

राष्ट्रवादी पक्ष कार्यालयावरुन दादा-साहेब कार्यकर्ते आमनेसामने; मानकरांच्या इशाऱ्यानंतर जगताप आक्रमक

by News Desk
February 8, 2024
in Pune, पुणे शहर
राष्ट्रवादी पक्ष कार्यालयावरुन दादा-साहेब कार्यकर्ते आमनेसामने; मानकरांच्या इशाऱ्यानंतर जगताप आक्रमक
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवारांच्या गटाला निवडणूक आयोगाच्या निकालात पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह दिल्यानंतर राज्यभरात शरद पवार गटामध्ये संतापाची लाट उसळली आहे. अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाचे नेते, कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या  कार्यालयांवर आपला हक्क गाजवत आहेत. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाद आता विकोपाला पोहचला आहे. परिणामी या पक्ष कार्यालयाला पोलीस बंदोबस्त पुरवण्यात आला आहे.

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाचा भाडेकरार हा शरद पवार गटाचे शरहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नावावर आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यावर पुण्यातील पक्ष कार्यालयावर दावा करण्यात येत आहे. पक्ष कार्यालयाच्या कोनशीलावरील अजित पवारांचं नाव दगडाने फोडून काढलं. त्यावर बोलताना अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी इशारा दिला आहे. अजित पवारांचा विश्वासघात केला असल्याचा गंभीर आरोप मानकरांनी केला आहे.

You might also like

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

दीपक मानकर काय म्हणाले?

‘प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या नावाने भाडेकरार न करता स्वत:च्या नावाने केला आहे. त्यांनी अजितदादांचा विश्वासघात केला आहे. तो करार आता संपला आहे. आधी ऑफिस टिकवून ठेवा मग तोडफोड करत बसा. तोडफोड आम्हालाही नविन नाही. आम्ही संयमाने वागतोय याचा अर्थ असा नाही की आम्ही तुमच्या सर्व गोष्टी सहन करू.’

‘शिल्लक राहिलेले नगरसेवक पकडून ठेवा. नाहीतर तेही पळून जातील. काहीही शिल्लक राहणार नाही. अनेकांचा ओघ आमच्याकडे आहे. काल झालेल्या निर्णयावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादाच आहेत. आणि पक्षाचे नाव, निवडणूक चिन्हही आम्हालाच मिळाले आहे. पहिले पक्ष चिन्ह ठरवा आणि मग बाकीचे उद्योग करा’, असं म्हणत मानकरांनी इशारा दिला. त्यावर आता प्रशांत जगतापही आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत.

काय म्हणाले प्रशांत जगताप?

“गुंडगिरी करून कार्यालय बळकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला वारंवार धमक्या दिल्या जात आहेत. जबरदस्तीने ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्याकडून ताबा मिळवण्याची वक्तव्य वारंवार कानी पडत आहेत”, असं म्हणत प्रशांत जगताप यांनी दीपक मानकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

Tags: ajit pawardeepak mankarElection CommissionncpParty OfficePrashant Jagtapsharad pawarअजित पवारदीपक मानकरनिवडणूक आयोगपक्ष कार्यालयप्रशांत जगतापराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार
Previous Post

पुणे पोलिसांच्या आदेशाला गुंडांनी दाखवली केराची टोपली; परेडनंतरही निलेश घायवळचे इन्स्टा रिल्स व्हायरल

Next Post

..अन् शिक्षण मंत्री बनले शिक्षक! चंद्रकांतदादांनी घेतली विद्यार्थ्यांची शाळा

News Desk

Related Posts

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

Recommended

“भाजपचे संकल्पपत्र म्हणजे विकसित भारताचे स्वप्न गाठण्याचा रोडमॅप”- मुरलीधर मोहोळ

“भाजपचे संकल्पपत्र म्हणजे विकसित भारताचे स्वप्न गाठण्याचा रोडमॅप”- मुरलीधर मोहोळ

April 14, 2024
“मी लोकसभेची तयारी करतोय, पण…” मुरलीधर मोहोळांनी अखेर लोकसभेचे पत्ते उघडले, नेमकं काय म्हणाले वाचा

“मी लोकसभेची तयारी करतोय, पण…” मुरलीधर मोहोळांनी अखेर लोकसभेचे पत्ते उघडले, नेमकं काय म्हणाले वाचा

March 1, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved