Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

“मी लोकसभेची तयारी करतोय, पण…” मुरलीधर मोहोळांनी अखेर लोकसभेचे पत्ते उघडले, नेमकं काय म्हणाले वाचा

by News Desk
March 1, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
“मी लोकसभेची तयारी करतोय, पण…” मुरलीधर मोहोळांनी अखेर लोकसभेचे पत्ते उघडले, नेमकं काय म्हणाले वाचा
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : लोकसभेची धामधूम सुरू झाली असल्याचे चित्र पुणे शहरात दिसत आहे. भाजप आणि कॉँग्रेस पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू असतानाच दोन्ही बाजूंनी लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असलेल्यांनी आपापली दावेदारी केली आहे. भाजपकडून माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे, शिवाजीराव मानकर, भाजपचे माजी सचिव सुनील देवधर उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. आपण इच्छुक असल्याचे या सर्वांनी उघडपणे प्रसारमाध्यमांसमोर सांगितले आहे. पण पुणे लोकसभेसाठीचे प्रबळ दावेदार असलेल्या माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आता पहिल्यांदाच माध्यमांशी पुणे लोकसभा या विषयावर संवाद साधला आहे. त्यांनी आजवर कधीही प्रसारमाध्यमांबरोबर बोलताना आपण लोकसभेसाठी दावेदार असल्याचे म्हटले नाही अथवा या सर्व घडामोडींदरम्यान ते कधीही प्रसार माध्यमांसमोर आले नाही. ते महापालिकेमध्ये आले असताना त्यांना प्रसार माध्यमांनी घेरले आणि ते लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच प्रसार माध्यमांसमोर आले. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

शहरातील पूरस्थिती नियंत्रणासाठी नाले आणि सीमा भिंती उभारणे, या अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी राज्य सरकारने तब्बल २०० कोटी रुपयांचा विशेष निधी पुणे महापालिकेस उपलब्ध करुन दिला आहे. या संदर्भात विशेष निधी मिळावा, यासाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. त्यावर तातडीने निर्णय घेत हा निधी उपलब्ध करुन दिला आहे. संदर्भातील शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला. त्यासंदर्भात मोहोळ यांनी पुणे महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली.

You might also like

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना घेरले आणि त्यांना ते लोकसभेची निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे का? असे विचारले असता, त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, पक्षाने माझ्यावर पुणे लोकसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिलेली आहे. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणला पाहिजे. त्यामुळे निवडणूक प्रमुख म्हणून निश्चितपणे पुण्याची जागा जिंकली पाहिजे आणि ती पुन्हा एकदा कायम ठेवली पाहिजे. त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत. निश्चितपणे ही जागा आम्ही जिंकणार आहोत. एक निवडणूक प्रमुख म्हणून माझी ती प्राथमिक जबाबदारी आहे आणि या निवडणुकीची तयारीही सुरु आहे.

त्यानंतरही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी तुम्ही स्वत: इच्छुक आहात का? हा प्रश्न लावून धरला तेव्हा, “संघटनेची जबाबदारी माझ्याकडे आहे. मी कार्यकर्ता आहे. कुठल्या कार्यकर्त्याला कधी वाटत नाही? पक्षांनी संधी दिली, तर कोण नाही म्हणतो? अशी भूमिका त्यांनी मांडली.

ते पुढे असेही म्हणाले की, “पण आमच्याकडे एक शिस्त आहे, एक पद्धत आहे. कोण इच्छुक आहे याच्यावर उमेदवार ठरत नसतो. तर पक्ष सांगतो त्यावेळेला मात्र पक्षाचा जो उमेदवार असेल तो निवडणुकीत जिंकून येईल यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो. मी निवडणूक प्रमुख म्हणून तयारी सुरू केली आहे. त्यामुळे जो उमेदवार असेल तो असेल, उद्या पक्ष मला म्हटला तर मी असेल.”

महत्वाच्या बातम्या-

-फडणवीसांनी शरद पवारांचं जेवणाचं आमंत्रण नाकारलं; म्हणाले, ‘आग्रही निमंत्रणाला..’

-लोकसभा निवडणूक २०२४: शिरुर लोकसभेच्या रिंगणात भाजपची उडी

-पुण्याच्या विकासासाठी शिवाजीराव मानकरांचे ‘हे’ व्हीजन; सांगितली विकासाची चतु:सूत्री

-महाविकास आघाडीत बिघाडी??? मावळ मतदारसंघात वंचितने केला दावा

-रविंद्र धंगेकर पुणे लोकसभा निवडणूक लढणार?; पक्षाकडे केली उमेदवारीची मागणी

Tags: bjpJagdish MulikMuralidhar MoholPune Lok Sabha ElectionShivaji MankarSunil Deodharजगदीश मुळीकपुणे लोकसभा निवडणूकभाजपमुरलीधर मोहोळशिवाजी मानकरसुनील देवधर
Previous Post

फडणवीसांनी शरद पवारांचं जेवणाचं आमंत्रण नाकारलं; म्हणाले, ‘आग्रही निमंत्रणाला..’

Next Post

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर फडणवीस म्हणाले,”मी अधिकृतपणे सांगतो की एकनाथ शिंदे…”

News Desk

Related Posts

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

by News Desk
July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
Next Post
मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर फडणवीस म्हणाले,”मी अधिकृतपणे सांगतो की एकनाथ शिंदे…”

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर फडणवीस म्हणाले,"मी अधिकृतपणे सांगतो की एकनाथ शिंदे..."

Recommended

Shirur Lok Sabha | शिरुरमध्ये ‘महागद्दार’वरुन दिलीप मोहिते अन् अमोल कोल्हेंच्यात चांगलीच जुंपली

Shirur Lok Sabha | शिरुरमध्ये ‘महागद्दार’वरुन दिलीप मोहिते अन् अमोल कोल्हेंच्यात चांगलीच जुंपली

April 18, 2024
“दुसऱ्यांवर टीका करून सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न”; आढळरावांचा अमोल कोल्हेंवर घणाघात

“दुसऱ्यांवर टीका करून सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न”; आढळरावांचा अमोल कोल्हेंवर घणाघात

April 29, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved