पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप कोथरूड विधानसभा उत्तर मंडळाच्या वतीने “महारक्तदान संकल्प” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकाच दिवशी तब्बल १०१४ रक्त युनिट्स संकलित करण्यात आले. या उपक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील तसेच पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी विशेष मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले.
या यशाबद्दल भाजप कोथरूड उत्तर मंडळ अध्यक्ष लहू गजानन बालवडकर यांनी सर्व रक्तदात्यांचे, स्वयंसेवकांचे आणि सहकार्य करणाऱ्या संस्थांचे आभार मानले. ‘सेवा हाच धर्म’ या तत्त्वाला कृतीत उतरवत आपण हजारो गरजू रुग्णांसाठी जीवनदान दिले. हे केवळ रक्तदान नसून, जबाबदारी, माणुसकी आणि सामाजिक एकतेचे प्रतीक आहे,” असे लहू बालवडकर म्हणाले.
या शिबिराचे उद्घाटन भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते पार पडले. भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे व महिला मोर्चा शहराध्यक्षा हर्षदा फरांदे यांनीही विशेष उपस्थिती लावली.
या “महारक्तदान संकल्प” उपक्रमाच्या आयोजनासाठी भाजप कोथरूड उत्तर मंडळातील अनेक पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. त्यामध्ये माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, सरचिटणीस गणेश कळमकर, पुनीत जोशी, राघवेंद्र बापू मानकर, रविंद्र साळेगावकर, सुशिल मेंगडे, सचिन पाषाणकर, प्रल्हाद सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, सचिन दळवी, मोरेश्वर बालवडकर, अस्मिता करंदीकर, अनिकेत चांदेरे, राहुल कोकाटे, रोहन कोकाटे, शिवम सुतार, सचिन सुतार, प्रमोद कांबळे, सुशिल सरकाटे, सुभाष भोळ, लखन कळमकर, डॉ. आनंद जराड, नवनाथ ववले, काळुराम गायकवाड, चंद्रकांत जाधव, अमोल पाटील, अर्थव देवरे, शरद भोते, सुहास भोते, शिवम बालवडकर, कबीर कदम यांचा समावेश होता.
महिला पदाधिकारी उमा गाडगीळ, वैदही बापट, प्रियंका पेंडसे, कल्याणी टोकेकर, निकिता माथाडे, जागृती विचारे, मृणाल गायकवाड, स्मृती जैन, मीना पारगावकर, सुजाता धनकुडे, स्नेहल चौगुले, वैशाली कमाजदार, प्राजक्ता देवस्थळी, विजया चांदोलकर, मोसंबी बकोरे, सविता जाधव, रेखा कश्यप, पायल मुरकूटे, प्रगती निसाळ, अर्चना देशपांडे, राणी मोहिते, मानषी कांबळे आदी मान्यवर देखील उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
-अजितदादांच्या आमदाराच्या भावाचा प्रताप; पोलिसांनी आवळल्या मुसक्या, नेमकं काय प्रकरण?
-पत्नीला शेजारची सीट नाही दिली म्हणून भाजप पदाधिकाऱ्याने थेट केंद्रीय राज्यमंत्र्याकडे केली तक्रार
-आधी काचेचे तुकडे आता अंडाभुर्जीत झुरळ; गुडलक कॅफेतील आणखी एक धक्कादायक प्रकार
-प्रियकराला फसवणे युवतीला पडले महागात, पोलिसांनी चक्र फिरवली; अत्याचाराचा बनाव अंगलट
-पालिकेच्या तृतीयपंथी सुरक्षारक्षकांना कित्येक महिने वेतनच नाही, थकलेला पगार मिळेल की नाही?