पुणे : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आज ७ मे पाकिस्तानच्या ९ दहशतवादी तळांवर ‘एअर स्ट्राइक’ करत चोख प्रत्युत्तर दिले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या या एअरस्ट्राइकमध्ये कुख्यात दहशतवादी मसूर अझहरच्या कुटुंबातील १४ जणांचा खात्मा झाला आहे. भारताने केलेल्या या एअर स्ट्राईकने पाकिस्ताने भारतावर केलेल्या ६ हल्ल्यांचा बदला असल्याचं बोललं जातंय.
२६ नोव्हेंबर २००८ साली मुंबई हल्ला, २० ऑक्टोबर २०२४ सोनगर्म हल्ल्याचा बदला, २४ ऑक्टोबर गुलमर्ग हल्ल्याचा बदला, २२ एप्रिल २०२५ पहलगाम हल्ल्याचा बदला, मार्च २०२५ जम्मू मधील ५ पोलिसांच्या हत्येचा बदला, २ जानेवारी २०१६ पठाणकोट बेसकॅम्प हल्ल्याचा बदला घेत भारताने एकाच वेळी ६ हल्ल्यांचा बदला घेतला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून भारतात तीव्र संताप व्यक्त केली जात होती. पाकिस्तानला धडा शिकवला जावा, अशी मागणी केली जात होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील भारताला समर्थन मिळत होतं. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय बैठका होत असताना लवकरच काहीतरी मोठं घडण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याचं उत्तर आता मिळालं असून भारतानं पाकव्याप्त जम्मू-काश्मीर आणि थेट पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमीपर्यंत कारवाई करत तब्बल ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-पुण्यात धक्कादायक प्रकार; रिक्षा चालकाने प्रवासी तरुणीला केले अश्लील मेसेज अन् व्हिडीओ कॉल करुन…
-दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘गोकुळ’नं दुधाच्या दरात केली इतक्या रुपयांची वाढ
-सायबर गुन्ह्यात वाढ: ‘सीबीआय’च्या कारवाईची भीती दाखवत महाविद्यालयीन तरुणीची लाखोंची फसवणूक
-प्रतीक्षा संपली! उद्याच जाहीर होणार इयत्ता बारावीचा निकाल; ‘या’ वेबसाईटवर पाहता येणार
-भाजपच्या शहराध्यक्षाचं नाव ठरलं, मुहूर्तही ठरला; कोणाच्या गळ्यात पडणार माळ?