पुणे : पुणे महापालिकेअंतर्गत थकीत मिळकत कर वसुली प्रक्रिया सध्या सुरू असून अनेकांना तीन पट मिळकत कर व वाढीव व्याज भरणे शक्य होत नाही, आर्थिक बोजा वाढत असल्या कारणाने करदाते नियमित मिळकतकर भरत नाहीत, त्यामुळे महापालिकेचेही आर्थिक नुकसान होत आहे, हे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि पुणेकरांना दिलासा देण्यासाठी ‘अभय योजना’ राबवावी आणि मिळकतकर आकारणी एक पटीने करावी, अशी मागणी भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पुणे महानगरपालिकेंतर्गत थकीत मिळकत कर वसुली प्रक्रिया सध्या सुरु आहे. अनेक नागरिकांना तीनपट मिळकत कर आणि वाढीव व्याज भरणे शक्य होत नाही. या आर्थिक बोजामुळे करदाते नियमितपणे मिळकत कर भरत नाहीत. त्यामुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे मुळीकांनी निदर्शनास आणून दिले आहे.
'पुणे महापालिकेत अभय योजना राबवून मिळकतकर आकारणी एक पटीने करावी'
पुणे महापालिकेअंतर्गत थकीत मिळकत कर वसुली प्रक्रिया सध्या सुरू असून अनेकांना तीन पट मिळकत कर व वाढीव व्याज भरणे शक्य होत नाही, आर्थिक बोजा वाढत असल्या कारणाने करदाते नियमित मिळकतकर भरत नाहीत, त्यामुळे महापालिकेचेही… pic.twitter.com/Gip1YyQOoS
— Jagdish Mulik (@jagdishmulikbjp) March 12, 2025
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नागरिकांवर थकबाकी मिळकत करासह वाढीव व्याजाचा मोठा बोजा टाकला जात आहे. या संदर्भात अभय योजना कार्यान्वित करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. त्यासाठी नियमावली जाहीर करावी. तसेच, तीन पट मिळकत कर आकारणी रद्द करून ती एक पटीने आकारण्यात यावी. या मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्यास पुणेकरांना मोठा दिलासा मिळून मिळकत कर भरपाई प्रक्रियेला गती मिळणार मिळेल, असे जगदीश मुळीक म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-आमदाराच्या मामाला संपवण्यापूर्वी जादूटोणा अन् मंत्रतंत्र; पुण्यातील धक्कादायक प्रकार उघड
-हप्ते वसूल करून आंदोलन… राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी धंगेकरांची कुंडलीच काढली
-स्वारगेट प्रकरणात धक्कादायक अपडेट; पीडितेला 7500 रुपये दिलेच नाहीत, नेमकं काय प्रकरण?
-कुख्यात गुंड गजा मारणेची सांगलीच्या कारागृहात रवानगी; नेमकं कारण काय?