Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

मुळशीकरांची वज्रमूठ महायुतीच्या पाठिशी! ज्या पक्षाने मला मोठं केलं, त्या पक्षाला मोठं करा! मोहोळांचं आवाहन

by News Desk
November 18, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण, विधानसभा
Murlidhar Mohol
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर-मुळशी- मावळ तालुक्याचा मेळावा कोथरूडमधील आशिष गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मतदारांना आवाहन केले आहे.  “मुळशीकरांनी ठरवलंय आणि ते खरं झालं नाही असं कधीही झालं नाही. भाजपने तुमच्यातल्या एका मुलाला संधी देऊन मोठं केलं आहे. त्यामुळे पक्षालाही आता मोठं करावं”, असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज केले.

चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री आणि मंत्री म्हणून आतापर्यंत आपल्या तालुक्यातील विकासकामांना ५३५ कोटीचा भरीव निधी दिला आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. यावेळी भाजप महायुतीचे कोथरूडचे उमेदवार चंद्रकांत पाटील, खडकवासल्याचे भीमराव तापकीर, भोर मुळशीचे शंकर मांडेकर, बाबासाहेब कंधारे, अंकुश मोरे, माऊली साठे, धैर्यशील ढमाले, डॉ. संदीप बुटाला, गोविंद आंग्रे, सुशील मेंगडे, गणेश वर्पे, अजय मारणे, नितीन शिंदे, निलेश शिंदे, सौ. मोनिका मोहोळ, अल्पना वर्पे यांच्या सह मुळशी तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की,‌ “मुळशीकरांनी ठरवलंय आणि ते खरं झालं नाही असं कधीही झालं नाही. २०१७ ची निवडणुकीत मुळशीकरांच्या निश्चयावर मी नगरसेवक होऊन राजकीय प्रवास सुरू झालो‌. आज तुमचा मुळशीकर माननीय नरेंद्र मोदीजींसोबत काम करतोय‌. तुमचा माणूस मोठा होतोय. हे सर्व भारतीय जनता पक्षाने घडवलंय. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला मोठं केलं पाहिजे.”

ते पुढे म्हणाले की, “चंद्रकांतदादा महायुती सरकार मध्ये अडीच वर्षे मंत्री आहेत. या अडीच वर्षाच्या काळात आपल्या तालुक्यातील अनेक कार्यकर्ते आणि सरपंच मुळशीच्या कामासाठी दादांना भेटत होते. त्या प्रत्येकाची कामे दादांनी करुन दिली आहेत. मागच्या काळातही सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून ३८८ कोटींची रस्त्याची कामं मुळशीत झाली‌. त्याआधी ६३ कोटी, आणि आता अडीच वर्षात ८४ कोटींची विकासकामे केली. त्यामुळे मुळशीच्या विकासासाठी दादांनी खूप योगदान दिले आहे.”

ते पुढे म्हणाले की, “शरद ढमाले यांच्यानंतर शंकर मांडेकर यांच्या रुपाने १५ वर्षांनंतर तालुक्याला नेतृत्व मिळालं आहे. त्यामुळे मुळशीकरांनी विचारांनी एकत्र आलं पाहिजे. उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा दिवस संपल्यानंतर महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याचं आम्ही ठरवलं आहे. शंकरभाऊंचा शून्यातून प्रवास सुरू झालाय. त्यामुळे आता आलेली संधी कोणीही सोडू नये. ज्यांचं कोथरुड आणि खडकवासला अशा शहरी भागात मतदान आहे, त्यांनी शहरात मतदान करावे. तर ज्यांचं ग्रामीण भागात मतदान आहे त्यांनी जास्तीत जास्त मतदान करुन महायुतीला विजयी करावे.”

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोथरुड आणि भोर विधानसभा मतदारसंघावर मुळशीकरांचा प्रचंड प्रभाव आहे. २०१९ मध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून आयोजित मेळाव्याची मदत झाली. त्या मेळाव्यात मी म्हटलं होतं. त्यानुसार तशी स्थिती आणण्यात देवेंद्रजी फडणवीस आणि मला संधी मिळाली. पक्ष नेतृत्वाच्या आदेशानुसार काम करण्याचा प्रघात आहे.‌ अडीच वर्षापैकी एक वर्षे मला पुण्याचं पालकमंत्री पद मिळालं. तेव्हा मुळशीचा जो ही व्यक्ती काम घेऊन आल्यावर, ती पूर्ण केली.

पाटील पुढे म्हणाले की, सध्या मी व्यक्ती विकासावर भर दिलाय. झाल उपक्रमाच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल कुटुंबांना मदत केली. त्यासोबतच अनेक मुलींना शिक्षणासाठी मदत करतो आहे. राज्यात महायुतीचे सरकार येणार हे नक्की आहे. हरियाणा मध्ये मतांचा टक्का वाढल्याने एनडीएचं सरकार आलं. हे सर्वेक्षणाच्या पकडीत येत नाही. त्यामुळे मताचा टक्का वाढवला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.‌

यावेळी खडकवासला मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर आणि भोर मुळशीचे महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी आपल्या मनोगतात जास्तीत जास्त मतदान करुन महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले.

महत्वाच्या बातम्या

-‘पर्वती’चा १५ वर्षात खुंटलेला विकास ५ वर्षात पूर्ण करणार; आबा बागुलांची ग्वाही

-गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवायचं! रासनेंसाठी कसब्यातील मंडळांची वज्रमूठ

-कसब्यात हेमंत रासने यांना वाढते समर्थन, विविध समाज संघटनांकडून पाठिंबा जाहीर

-‘ज्यांनी बारामतीत हे पार्क उभं केलं आज त्यांच्याच पत्नीला तिथं जाण्यापासून अडवलं’, सुप्रिया सुळे आक्रमक

-‘हिंदुत्ववादी सरकार म्हणून समाज अन् देश सुरक्षित’- गोविंद देवगिरी महाराज

Tags: bjpChandrakant PatilMulshiMurlidhar Moholचंद्रकांत पाटीलभाजपमुरलीधर मोहोळमुळशी
Previous Post

‘पर्वती’चा १५ वर्षात खुंटलेला विकास ५ वर्षात पूर्ण करणार; आबा बागुलांची ग्वाही

Next Post

‘देशात बारामतीची ओळख कोणामुळे हे सगळ्यांना माहितीये’; सांगता सभेतून शरद पवारांचा अजितदादांवर निशाणा

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
Sharad Pawar and Ajit Pawar

'देशात बारामतीची ओळख कोणामुळे हे सगळ्यांना माहितीये'; सांगता सभेतून शरद पवारांचा अजितदादांवर निशाणा

Recommended

Monsoon

यंदा ८-१० दिवस आधीच पावसाचं आगमन होणार; ‘या’ दिवशी पुण्याला यलो अलर्ट, भारतीय हवामान विभागाची माहिती

May 8, 2025
नाद करा पण पोलिसांचा कुठं?; मनोरमा खेडकर महडच्या हॉटलमध्ये लपल्या होत्या, अखेर पोलिसांनी अटक केलंच

नाद करा पण पोलिसांचा कुठं?; मनोरमा खेडकर महडच्या हॉटलमध्ये लपल्या होत्या, अखेर पोलिसांनी अटक केलंच

July 18, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved