Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

शहरात वर्चस्वासाठी दोन मंत्र्यांमध्ये स्पर्धा? मिसाळ- मोहोळांनी घेतल्या स्वतंत्र बैठका; भाजपमध्ये नेमकं काय चाललंय

by News Desk
January 10, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Madhuri Misal And Murlidhar Mohol
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यात येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुसाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपच्या मंत्र्यांमध्ये देखील अंतर्गत वाद असल्याचं चित्र पहायला मिळालं आहे. पुण्याचा कारभारी होण्यासाठी भाजपच्या नेत्यांमध्ये स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे.

आमदार माधुरी मिसाळ आणि खासदार मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी वेगवेगळ्या बैठका घेतल्या. या आढावा बैठकांमुळे पक्षात दुफळी असल्याचे चित्र पहायला मिळालं असून हा मुद्दा आता राजकीय वर्तुळाच चर्चेचा विषय ठरत आहे. आमदार  मिसाळ आणि खासदार मोहोळ यांच्यात चढाओढ सुरु झाली आहे. शहरातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मोहोळ आणि मिसाळ यांनी स्वतंत्र आढावा बैठका घेतल्या.

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आलेले मुरलीधर मोहोळ हे केंद्रात राज्यमंत्री आहेत. तर सलग चार वेळा आमदार झालेल्या माधुरी मिसाळ या फडणवीसांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री आहेत. या दोन्ही राज्यमंत्र्यांमध्ये कोल्ड वॉर सुरु झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

गेल्या आठवड्यात मुरलीधर मोहोळ यांनी विकासकामांचा आढावा घेतला. बोलावलेल्या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, शहरातील आमदार, माजी नगरसेवक हजर होते. या बैठकीला मिसाळ गैरहजर होत्या मात्र, त्यानंतर आज मंत्री माधुरी मिसाळ यांनी वेगळी बैठक घेतली. या बैठकीला त्यांच्या गटाचे माजी नगरसेवक उपस्थित होते. या वेगवेगळ्या बैठकांवरुन शहरावरील आपलं वर्चस्व दाखवण्याचे प्रयत्न दोन्ही मंत्र्यांकडून सुरु असल्याचं बोललं जात आहेत. त्यामुळे आता पक्षातील एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

एकाच पक्षातील २ मंत्र्यांनी स्वतंत्र बैठका घेतल्याची चर्चा रंगू लागल्याने मिसाळ यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. “कारभारावरुन आमच्यात मतभेद नाहीत. त्यादिवशी मला ऐनवेळी एका बैठकीला जावं लागलं. त्यामुळे मी महापालिकेतील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीला हजर राहू शकले नाही. केंद्रीय मंत्र्यांनी ती बैठक घेतली. कारण सगळ्यांनाच शहरासाठी आपण काहीतरी करायला हवं असं वाटतं”, असे माधुरी मिसाळ म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-‘HMPV’ची जगाला धास्ती; पुण्यात मात्र आधीपासूनच होतेय व्हायरसची लागण

-भाजपमध्ये प्रवेश केलेले नगरसेवक म्हणाले ‘शिवसेना ठाकरेंची’; पुण्यात शिंदेच्या सेनेचे पदाधिकारी भडकले

-‘तुम्हाला जमत नसेल तर पदं सोडा’; अजितदादा नेमकं कोणावर भडकले

-“‘ती’ योजना बंद केली तर महिलांशी…”; ‘लाडकी बहिण’बाबत चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

-ठाकरेंची साथ सोडली भाजपमध्ये प्रवेश, तरीही नगरसेवक म्हणतात, ‘खरी शिवसेना ठाकरेंचीचं’

Tags: bjpChandrakant PatilMadhuri MisalMunicipal CorporationMuralidhar Moholpuneचंद्रकांत पाटीलपुणेभाजपमहापालिकामाधुरी मिसाळमुरलीधर मोहोळ
Previous Post

‘HMPV’ची जगाला धास्ती; पुण्यात मात्र आधीपासूनच होतेय व्हायरसची लागण

Next Post

‘मावळ पॅटर्न’ला प्रदेश भाजपचा छुपा पाठिंबा होता?; बावनकुळेंनी केला मोठा खुलासा

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
Chandrashekahr Bawankule

'मावळ पॅटर्न'ला प्रदेश भाजपचा छुपा पाठिंबा होता?; बावनकुळेंनी केला मोठा खुलासा

Recommended

होमग्राऊंडवर अजित पवारांना आणखी एक धक्का; आमदार घेणार हाती तुतारी, पवारांची भेटही झाली

अजित पवार शरद पवारांसोबत जाणार?; कार्यकर्ते म्हणाले, ‘दादांना पक्षात घेतले तर…’

July 29, 2024
Sinhgad

महाराष्ट्राची शौर्यगाथा पहायला आलेल्या परदेशी पाहुण्याला महाराष्ट्रीयन तरुणांनी शिकवल्या शिव्या; शिवप्रेमींमध्ये संताप

April 12, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved