पुणे : पुण्यातील कॅफे गुडलक हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. शहरातील मुख्य भागात असणाऱ्या गुडलक कॅफेमध्ये एका ग्राहकाच्या बनमस्कामध्ये काचेचे तुकडे आढळले होते. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनन विभागाने एफसी रोडवरील शाखेचा परवाना तात्पुरता रद्द केला होता. त्यानंतर आता मुंंबई-पुणे हायवेवरील फूड प्लाझामध्ये असलेल्या गुडलक कॅफेमधील अंडाभुर्जीच्या ताटात झुरळ निघाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
अन्न आणि औषध प्रशासनन विभागाने कॅफेला स्वच्छता आणि सुरक्षेच्या त्रुटी सुधारण्याचे आदेश दिले होते. या त्रुटींची पूर्तता केल्यानंतरच कॅफेला पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळणार होती. मात्र, चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच दुसऱ्या शाखेत झुरळ आढळल्याने ग्राहकांमध्ये संताप वाढला आहे. मुंबई -पुणे हायवेवरील फूड प्लाझामध्ये झुरळ आढळल्याची घटना उघड झाल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. तसेच सोशल मीडियावर देखील यावरुन चांगल्याच प्रतिक्रिया उमटत आहेत.
प्रसिद्ध असलेल्या या हॉटेलमध्ये असे प्रकार आता समोर आल्याने कॅफेची प्रतिमा डागाळली आहे. या घटनेनंतर अन्न सुरक्षा विभागाने या शाखेचीही चौकशी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. एकाच ब्रँडच्या दोन शाखांमध्ये सलग अन्नातील अशुद्धता आढळणे, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं अन्न तज्ज्ञांचे म्हणणे आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास काय परिणाम होतो, याचे हे जिवंत उदाहरण असल्याचे समोर आलं आहे. गुडलक व्यवस्थापनाने अद्याप या प्रकरणावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
महत्वाच्या बातम्या
-प्रियकराला फसवणे युवतीला पडले महागात, पोलिसांनी चक्र फिरवली; अत्याचाराचा बनाव अंगलट
-पालिकेच्या तृतीयपंथी सुरक्षारक्षकांना कित्येक महिने वेतनच नाही, थकलेला पगार मिळेल की नाही?
-वैष्णवी हगवणेच्या मृत्यूचं धक्कादायक कारण आलं समोर; चौकशी समतीच्या अहवालाने खळबळ
-‘ही बॅटरी लवकरच संपणार’, शिंदेसेनेनं आदित्य ठाकरेंना डिवचलं
-शरद पवारांना मोठा धक्का; जुना सहकरी अजितदादांच्या संपर्कात?