Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

Pune Lok Sabha | … म्हणून धंगेकरांपेक्षा मोहोळ ठरताय सरस! पुणे लोकसभा मतदारसंघात नेमकं गणित काय? वाचा सविस्तर

by News Desk
April 1, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
Pune Lok Sabha | … म्हणून धंगेकरांपेक्षा मोहोळ ठरताय सरस! पुणे लोकसभा मतदारसंघात नेमकं गणित काय? वाचा सविस्तर
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे लोकसभा मतदार संघात अद्याप महायूती आणि महाविकास आघाडी अशीच सरळ लढत होणार असल्याचे चित्र आहे. दोन्ही बाजूने प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क सुरू असून विविध घटकांच्या गाठीभेटींवर भर दिला जात आहे. महयुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या समोर मागील दोन निवडणुकांमध्ये (2014 आणि 2019) भाजपच्या उमेदवाराला मिळालेले मताधिक्य टिकवणे अथवा त्यामध्ये वाढ करणे हे आव्हान आहे तर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या समोर भाजपच्या उमेदवाराचे मताधिक्य कमी करून स्वत:च्या पक्षातील मागील दोन निवडणुकीत मिळलेली मते टिकवणे, हे आव्हान आहे. यामध्ये कोण यशस्वी होतो त्यावरच विजयाची गणिते अवलंबून आहेत. सद्यस्थितीत मोहोळ हे धंगेकरांच्या तुलनेत कितीतरी पटीने सरस असल्याचे चित्र आहे. धंगेकर हे आव्हान कसे पेलतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवारांनी 3 लाखांपेक्षा मताधिक्य घेतले आहे. त्यामध्ये कोथरूड,वडगाव शेरी, पर्वती, कसबा विधानसभा मतदार संघांचा मोठा वाटा होता. या चार मतदार संघांमध्ये राज्यांमध्ये झालेल्या राजकीय घडामोडी, पुणे शहरांतर्गत पक्ष पातळ्यांवरचे राजकारण याचा परिणाम 2024 च्या निवडणुकीत दिसणार आहे. त्याच्यावरही बरीच गणिते अवलंबून आहेत.
शिवसेना फूटीनंतर शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना(उबाठा) अशी शिवसेनेच्या मतदानाची विभागणी, कोथरूड विधानसभेत खासदार मेधा कुलकर्णी यांना नाकारण्यात आल्यानंतर भाजपवर ब्राह्मण समाजाची नाराजी, त्यानंतर मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेवर लागलेली वर्णी, महाविकास आघाडीतील एकमेकातील समन्वयाचा अभाव, काँग्रेस पक्षांतर्गत स्थानिक नेत्यांमध्येच असलेली नाराजी, देश पातळीवरील विकासाचा मुद्दा आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पुणे शहरासाठी झालेली कामे या सर्व गोष्टींचा होणाऱ्या मतदानावर प्रभाव असणार आहे.

You might also like

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

कोथरूडमधून गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य भाजपच्या उमेदवाराला मिळाले. आता मेधा कुलकर्णी या मतदार संघात सक्रिय झाल्या असून त्यांनी कोथरूडमधून मोहोळ यांना 2 लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळवून देण्याचा विडा उचलला आहे.

शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) झोकून देऊन मोहोळ यांच्या प्रचारात सहभागी झाला आहे. दुसरीकडे शिवसेना (उबाठा) मात्र अगोदर कसबा विधानसभा आम्हाला द्याल असा शब्द द्या, तरच काम करू या भूमिकेवर अडून बसला आहे. त्यामुळे शिवसेना (उबाठा) पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते कितपत धंगेकरांचे काम करतात यावरही कसबा पोटनिवडणुकीमध्ये त्यांना मिळालेले मताधिक्य ते लोकसभेत टिकवतात का? हे महत्वाचे ठरणार आहे.

वडगाव शेरीमध्ये 2014 पासून भाजपच्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये वाढ झाली आहे. सुरुवातीला उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज असलेले माजी शहराध्यक्ष जगदीश, मुळीक यांची समजूत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढल्यानंतर ते जोमाने कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी(अजित पवार गट) यावेळी भाजपबरोबर आहे. वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे हे अजित पवार गटात आहेत. त्यामुळे त्यांची ताकद मोहोळांना अधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी उपयोगी पडणार आहे.

पर्वतीमध्ये भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ आमदारकी टिकवण्यासाठी आणि येथून विधानसभेसाठी इच्छूक असलेले महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले हे विधानसभेचे तिकीट मिळण्यासाठी जोरदार कामाला लागले आहेत. त्याचा फायदा आपसुकच मोहोळ यांना मताधिक्य मिळण्यात होणार आहे. दुसरीकडे पर्वती मतदार संघातील कॉँग्रेसचे स्थानिक नेते आबा बागूल यांनी पक्षाविरोधातच बंड पुकारले आहे तर पर्वती मतदार संघात काँग्रेसचा दूसरा तगडा नेता नसल्याने मोहोळ यांना त्याचा फायदा होणार आहे.

पुण्यामध्ये काँग्रेसची पारंपरिक मते आहेत.परंतु, त्याचा ठराविक आकडा ठरलेला आहे. आता बदललेली परिस्थिती, काँग्रेस पक्षामध्ये असलेली अंतर्गत सुंदोपसुंदी, केंद्र सरकारने पुणे शहरासाठी केलेली कामे. त्यामध्ये मेट्रो, चांदणी चौकातील आणि कर्वे रस्त्यावरील उड्डाण पूल, नदी सुधार प्रकल्पासाठी दिलेला निधी, देशातील सामान्य माणसासाठी विमान प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होईल यासाठी लोहगाव येथील पुणे विमानतळ येथे उभारलेले एकात्मिक टर्मिनल या मोहोळ यांच्या दृष्टीने जमेच्या बाजू आहेत. या गोष्टींचाही परिणाम कोण किती मताधिक्य घेते यावर होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘तुम्ही माघार घेतली अन् माझी गोची झाली, लोक माझ्यासह तुमचाही उद्धार करताहेत’; शिवतारेंच्या कार्यकर्त्याचं पत्र व्हायरल

-Shirur Lok Sabha | ‘वाचाळवीरासारखं बरळणं बरं नाही’; आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंना धरलं धारेवर

-Shirur Lok Sabha Election | ‘राजगुरुनगरमध्ये तुमचं योगदान काय?’; दिलीप मोहितेंचा अमोल कोल्हेंना सवाल

-मोदीजींचे काम मतदारांपर्यंत पोहचवा! मोहोळांसाठी चंद्रकांत पाटलांच्या मॅरेथॉन बैठका

-बारामतीमध्ये रंगणार हायव्होल्टेज ड्रामा; सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा

Tags: bjpCongressINCLok Sabha ElectionMurlidhar MoholpuneRavindra Dhangekarकाँग्रेसपुणेभाजपमुरलीधर मोहोळरवींद्र धंगेकरलोकसभा निवडणूक
Previous Post

‘तुम्ही माघार घेतली अन् माझी गोची झाली, लोक माझ्यासह तुमचाही उद्धार करताहेत’; शिवतारेंच्या कार्यकर्त्याचं पत्र व्हायरल

Next Post

पुणेकरांना खूशखबर! आजपासून आंबा महोत्सव सुरु; थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करा हापूस

News Desk

Related Posts

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

Recommended

Voters List Pune

विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाची तयारी पूर्ण; जाहीर केली अंतिम मतदार यादी

August 30, 2024
मावळात ठाकरेंच्या शहरप्रमुखाला अटक; मतदान केंद्रावर झाली झटापट

मावळात ठाकरेंच्या शहरप्रमुखाला अटक; मतदान केंद्रावर झाली झटापट

May 13, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved