पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे विमानतळ होणार असून या विमानतळाच्या जमीन अधिग्रहणाला ७ गावांनी विरोध दर्शवला आहे. तालुक्यातील तब्बल ७ गावांचा विरोध आहे. गेल्या आठवड्याभरापासून या विमातळाच्या कामाविरोधात तालुक्यातील ७ गावांनी आंदोलन केले. ७ गावांतील शेतकऱ्यांचा विरोध असताना देखील शनिवारी प्रशासनाकडून विमानतळाच्या जागेचे ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाला स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला यावेळी पोलिसांकडून देखील लाठीचार्ज करण्यात आला. धक्कादायक म्हणजे या लाठीचार्ज मध्ये एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
कोणत्या ७ गावांचा विरोध?
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, मुंजवडी, उदाचीवाडी, एखतपूर, कुंभारवळण, खानवडी आणि पारगाव या ७ गावांचा विरोध आहे. तर या गावांमधील २ हजार ६७३ हेक्टर इतके भूसंपादन पुरंदर विमानतळासाठी करण्यात येणार आहे. या भूसंपादनाला सात गावांतील शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध दर्शवला आहे. सर्वेक्षणावेळी विरोध करणाऱ्या शेतकरी, ग्रामस्थांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.
‘पोलिसांना आमच्यावर लाठीचार्ज केला आहे. आम्ही अतिरेकी आहोत का? आमच्यारती लाठीचार्ज केला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. आमच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. प्रशासनामुळे आमच्या महिलेचा जीव गेला आहे. याआधी अनेक आंदोलने, उपोषणे केली मात्र, प्रशासनाने कोणतीही दाद दिली नाही. आता आमचा जीव गेला तरी चालेल पण माघार नाही’ अशी भूमिका तालुक्यातील ग्रामस्थांनी घेतली आहे. या लाठीचार्जमध्ये अंजनाबाई कामठे या वृद्ध महिलेचा जीव गेल्याने हे प्रकरण चांगलेच तापले आहे. यावर आता सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं सर्वांसाठी महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या
-‘काश्मीर सोडून देशात हल्ल्याआडून राजकारण केलं जातंय’; काश्मीरच्या माजी अर्थमंत्र्यांचं वक्तव्य
-आता मुंबईचे हेलपाटे थांबणार, वैद्यकीय मदतीसाठी जिल्हास्तरावरच अर्ज करण्याची सुविधा
-पुणेकरांची पाणी कपातीतून सुटका नाही; सोमवारपासून ‘या’ भागांमध्ये पाणी कपात लागू
-दत्ता गाडेच्या गुगल हिस्ट्रीतून धक्कादायक माहिती; तब्बल २२ हजार अश्लील व्हिडीओ….