पुणे : पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारी सत्र सुरुच आहे. शहरातील स्वारगेट बस स्टँडमध्ये २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण राज्य हादरुन गेले. हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले असून हे प्रकरण सध्या पुणे सत्र न्यायालयामध्ये सुरु आहे. ही घटना ताजी असताना शहरामध्ये महिला अत्याचाराची आणखी एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आली आहे. शहरात वारंवार होत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांवरुन महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत एका तरुणीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. सिद्धांत रणधीर असे आरोपीचे नाव असूनया नराधमाने ओळखीचा गैरफायदा घेत पीडीतेवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. आरोपीने पीडितेवर अत्याचार केल्यानंतर इतक्यावरच तो थांबला नाही तर त्याने तिला सोशल मीडियाद्वारे वारंवार धमकीही दिल्याचे पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये आरोपी सिद्धांत रणधीर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीने अत्याचार केला त्यानंतर पीडित तरुणीने पोलिसांकडे तक्रार देऊन तब्बल २० दिवस उलटले आहेत. तरीही अद्याप आरोपीला अटक झाली नाही, पीडितेला सोशल मीडियावर दिलेल्या धमक्या तसेच आरोपीने तिला अश्लील फोटो पाठवले आहेत. यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन, सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल करून तो आमच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे. २६ फेब्रुवारीला भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला तो गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास महिला पोलीस अधिकारी यांच्याकडे देण्यात आलेला आहे. पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार संबंधित आरोपीच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून त्यावर त्याचा पुढील तपास सुरू केलेला आहे. तांत्रिक तपासणीमध्ये काही अडचणी आल्यामुळे आरोपीपर्यंत पोहोचता आलेलं नाही. आम्हाला आणखी काही दुवे मिळाले आहेत. त्या आधारे आम्ही त्याला लवकरात लवकर अटक करू. तो तरुणीला धमक्या देत आहे, त्यानुसार कलमांमध्ये वाढ केलेली आहे आणि त्यामध्ये कारवाई देखील केली जाईल. या प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांच्या हितासाठी जगदीश मुळीकांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी
-आमदाराच्या मामाला संपवण्यापूर्वी जादूटोणा अन् मंत्रतंत्र; पुण्यातील धक्कादायक प्रकार उघड
-हप्ते वसूल करून आंदोलन… राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी धंगेकरांची कुंडलीच काढली
-स्वारगेट प्रकरणात धक्कादायक अपडेट; पीडितेला 7500 रुपये दिलेच नाहीत, नेमकं काय प्रकरण?