Saturday, June 7, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

हगवणे प्रकरणात आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचं कनेक्शन; 700-800 कोटींची मालमत्ता असणारा शशिकांत चव्हाण कोण?

by News Desk
June 6, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Shashikant Chavan
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू असताना अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. या प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी फरार होण्यासाठी वापरलेली थार गाडी संकेत चोंधे यांच्या मालकीची होती. याच संकेत चोंधे यांच्या पत्नी धनश्री चोंधे यांनी पती आणि दीर यांच्याविरोधात खडक पोलीस ठाण्यात छळवणुकीची तक्रार नोंदवली होती. मात्र, या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही, असा गंभीर आरोप धनश्री यांनी केला आहे. ‘तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांचे राजेंद्र हगवणे, जालिंदर सुपेकर आणि संकेत चोंधे यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याने तक्रार दुर्लक्षित करण्यात आली’, असा आरोप धनश्री चोंधे यांनी केला आहे. शिवसेना (ठाकरे) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावर पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे.

“शशिकांत चव्हाण यांची बहीण ही जालिंदर सुपेकर यांची पत्नी आहे. संकेत चोंधे यांच्याविरोधात खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल आहे, तर शशिकांत चव्हाण यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत. चव्हाण आणि त्यांच्या साथीदारांवर ३०७ चा गुन्हा नोंदवला गेला असून, ते सध्या जामिनावर बाहेर आहेत आणि त्यांना सेवेत बढतीही मिळाली आहे. चाकण पोलीस ठाण्यात चव्हाण यांच्यावर चारचाकी गाडीशी संबंधित गुन्हा दाखल आहे. मोक्का कारवाई टाळण्यासाठी चव्हाण यांनी १० लाख रुपयांची मागणी केली होती”, अशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिली आहे.

You might also like

दंडेलशाही करणाऱ्या ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्याला महापालिकेचा दणका, थेट केली पालिकेत नो एंट्री

FC रोडवरील ‘त्या’ 40 हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांची कारवाई; आरसीबी फॅन्सवर गुन्हे दाखल, वाचा नेमकं काय कारण?

चौकीदारही चोर है! बारामतीत पोलिसानेच मारला विद्यार्थ्यांच्या दप्तर अन् मोबाईलवर डल्ला

‘RTI अंतर्गत मागवलेल्या माहितीत चव्हाण यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांची माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. रावेत येथे भरत चव्हाण यांच्या नावावर जमीन करारनामा आहे, ज्यामध्ये चव्हाण यांच्या पत्नी आणि वडिलांचे नाव आहे. रावेतमधील एलिगन्स नावाच्या स्कीममध्ये कोटींच्या किमतीचे फ्लॅट आहेत. सुषमा अंधारे यांनी याबाबत गृहमंत्र्यांना या संपत्तीचा उत्पन्नाचा स्रोत तपासण्याची विनंती केली आहे. त्यांनी असा सवाल उपस्थित केला की, इतकी मोठी मालमत्ता असलेले चव्हाण गरीबांना न्याय देऊ शकतील का? तसेच, वैष्णवी हगवणे प्रकरणाशी चव्हाण यांच्यावरील सीडीआरचे आरोप जोडलेले आहेत का, याची चौकशी व्हावी’, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

शशिकांत चव्हाणची कोट्यावधींची मालमत्ता

शशिकांत चव्हाण यांच्या अनेक तालुक्यांमध्ये मालमत्ता आहे. रावेतमधील एका स्कीममधील फ्लॅटची किंमत २.५ कोटी रुपये आहे आणि एकूण मालमत्ता ७०० ते ८०० कोटी रुपयांच्या घरात असण्याची शक्यता आहे. इतक्या मोठ्या मालमत्तेच्या मालकाकडे धनश्री चोंधे यांच्या तक्रारीकडे लक्ष का गेले नाही? असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणाशी या सर्व व्यक्तींचा काही ना काही संबंध आहे. गृहमंत्र्यांना या प्रकरणातील सर्वांची चौकशी करण्याची मागणी आता अंधारेंनी केली आहे.

शशिकांत चव्हाण यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असताना त्यांना जामिनावर सुटका आणि बढती मिळाली, याबाबत सुषमा अंधारे यांनी आश्चर्य व्यक्त केले. ‘हगवणे कुटुंबाला पोलीस खात्यातील नातेवाइकांमुळे कोणतीही कारवाई होणार नाही, असे वाटत होते. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि चव्हाण यांच्या मालमत्तेचा आणि उत्पन्नाचा स्रोत तपासला जावा’, अशी मागणी अंधारे यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या

-१० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुणे महापालिकेची योजना, ‘या’ विद्यार्थांना मिळणार १५ हजार रुपये अनुदान; लाभ कसा घ्यायचा?

-PMC: महिला अधिकाऱ्याला त्रास देणारा भाजप पदाधिकारी कोण? बड्या नेत्यासोबत उठबस, कारवाई होणार का?

-पुणेकरांनो, बकरी ईद निमित्त शहरातील हे रस्ते असणार बंद; पहा कोणते पर्यायी मार्ग

-दादांच्या कार्यकर्त्यांना हवाय साहेबांचा आशिर्वाद; पुण्यात झळकले बॅनर्स

-निलेश चव्हाणचा शस्त्र परवान्याचा पुणे पोलिसांनी फेटाळला, थेट मंत्रालयातून सूत्रं हलवली; ‘या’ बड्या नेत्याचंही नाव आलं समोर

Tags: Jalindar SupekarpuneRajendra HagawaneShashikant ChavanVaishnavi Hagawaneजालिंदर सुपेकरपुणेराजेंद्र हगवणेवैष्णवी हगवणेशशिकांत चव्हाण
Previous Post

१० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुणे महापालिकेची योजना, ‘या’ विद्यार्थांना मिळणार १५ हजार रुपये अनुदान; लाभ कसा घ्यायचा?

Next Post

राजगडच्या बालेकिल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरला अन् थेट ४०० फूट दरीत कोसळली, विवाहितेचा मृत्यू

News Desk

Related Posts

Omkar Kadam
पुणे शहर

दंडेलशाही करणाऱ्या ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्याला महापालिकेचा दणका, थेट केली पालिकेत नो एंट्री

by Team Local Pune
June 6, 2025
Pune Police
Pune

FC रोडवरील ‘त्या’ 40 हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांची कारवाई; आरसीबी फॅन्सवर गुन्हे दाखल, वाचा नेमकं काय कारण?

by News Desk
June 6, 2025
Maharashtra Police
Pune

चौकीदारही चोर है! बारामतीत पोलिसानेच मारला विद्यार्थ्यांच्या दप्तर अन् मोबाईलवर डल्ला

by News Desk
June 6, 2025
Mulshi Patern
Pune

पुण्यात पुन्हा ‘मुळशी पॅटर्न’चा थरार; वादातील जमिन पाहण्यासाठी गेले अन्…

Please login to join discussion

Recommended

Eknath Shinde, Devendra Fadnavis And Ajit Pawar

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?; केसरकर म्हणाले, ‘ते मोदी-शहांचं…’

December 5, 2024
BJP FLag

पुण्यातून भाजप फुंकणार विधानसभेचे रणशिंग, अमित शहांच्या उपस्थितीत ठरणार रणनीती

July 20, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Omkar Kadam
पुणे शहर

दंडेलशाही करणाऱ्या ‘त्या’ भाजप पदाधिकाऱ्याला महापालिकेचा दणका, थेट केली पालिकेत नो एंट्री

June 6, 2025
Pune Police
Pune

FC रोडवरील ‘त्या’ 40 हुल्लडबाजांवर पुणे पोलिसांची कारवाई; आरसीबी फॅन्सवर गुन्हे दाखल, वाचा नेमकं काय कारण?

June 6, 2025
Maharashtra Police
Pune

चौकीदारही चोर है! बारामतीत पोलिसानेच मारला विद्यार्थ्यांच्या दप्तर अन् मोबाईलवर डल्ला

June 6, 2025
Mulshi Patern
Pune

पुण्यात पुन्हा ‘मुळशी पॅटर्न’चा थरार; वादातील जमिन पाहण्यासाठी गेले अन्…

June 6, 2025
राजगडच्या बालेकिल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरला अन् थेट ४०० फूट दरीत कोसळली, विवाहितेचा मृत्यू
Pune

राजगडच्या बालेकिल्ल्यावर फोटो काढताना पाय घसरला अन् थेट ४०० फूट दरीत कोसळली, विवाहितेचा मृत्यू

June 6, 2025
Shashikant Chavan
Pune

हगवणे प्रकरणात आणखी एका पोलीस अधिकाऱ्याचं कनेक्शन; 700-800 कोटींची मालमत्ता असणारा शशिकांत चव्हाण कोण?

June 6, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved