पुणे : राजकारणा सत्ताधारी विरोधकांमध्ये वाद झाल्याचं अनेकदा पहायला मिळतं पण सत्ताधाऱ्यांमध्येही खटके उडत असतात. सध्या भाजप मंत्री आणि शिंदे सेनेचे मंत्री यांच्यातील वाद पाहता महायुती सरकारमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचं दिसत आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात बैठक घेण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. सामाजिक न्याय विभागातील कामकाजासंदर्भातील बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्याच्या आरोपावरुन संजय शिरसाट यांनी खरमरीत पत्र लिहिले तर आता ‘राज्यमंत्र्याला बैठक घेण्याचा अधिकार’ आहे, असं म्हणत मंत्री मिसाळ यांनी शिरसाटांना सडेतोड उत्तर दिले आहे.
नेमकं काय प्रकरण?
सामाजिक न्याय विभागातील कामकाज मंत्री आणि राज्यमंत्री यांच्याच वाटप झाले असताना आमदारांच्या पत्रावरून मिसाळ यांनी काही बैठका घेत अधिकारी आणि कर्मचारी यांना विविध निर्देश दिले होते, मात्र याबाबत शिरसाट यांना या बैठकांबाबत कोणतीच कल्पना नव्हती. या बैठकांची माहिती शिरसाट यांना मिळाल्यानंतर त्यांनी थेट राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. विषयासंबधित आपणास बैठक घ्यावयाची असल्यास सदर बैठक माझ्या अध्यक्षतेखाली आयोजित करणे संयुक्तिक राहीलं असे खरमरीत पत्र शिरसाट यांनी थेट मिसाळ यांनी लिहिले. त्यावर आता मिसाळ यांनी पत्राला उत्तर देत राज्यमंत्र्याला बैठका घेण्याचा अधिकार आहे, असं म्हणत मिसाळांनी उत्तर दिलं.
मंत्री मिसाळ यांनी पत्रात काय लिहलं?
सामाजिक न्याय विभागाची राज्यमंत्री म्हणून विभागाच्या आढावा बैठका घेण्याचा मला अधिकार आहे. बैठका घेण्यासाठी आपली पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता वाटत नाही. मी घेतलेल्या बैठकीत कोणतेही निर्णय घेतले नाहीत आणि निर्देशही दिले नाहीत. राज्यमंत्री म्हणून मी घेतलेल्या बैठकांमध्ये निदर्शनास आलेल्या बाबींबद्दल अधिकाऱ्यांना काही सूचना करणे किंवा निर्देश देणे काही गैर नाही, अशी माझी धारणा आहे. सदर बैठकीत मी कोतेही निर्णय घेतलेले नाहीत. तो खात्याचे मंत्री म्हणन आपला अधिकार आहे. आढावा बैठका घेऊन मी आपल्या अधिकारात कोणतीही ढवळाढवळ केली नाही. तरीही मी कोणतेही निर्णय घेतले असल्यास याबाबत प्रकरण पुरत्वे उदाहरणे कृपया सांगावी, असे माधुरी मिसाळ पत्रामध्ये म्हणत त्यांनी शिरसाट यांच्या अधिकारात ढवळाढवळ केल्याचा शिरसाटांचा आरोप फेटाळला आहे.
महत्वाच्या बातम्या
-दारुचे १० रुपये कमी दिले म्हणून डोक्यात फोडली बिअरची बाटली, व्हिडीओ व्हायरल झाला अन्….
-मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ‘महारक्तदान शिबिर’; १०१४ युनिट रक्त संकलित
-अजितदादांच्या आमदाराच्या भावाचा प्रताप; पोलिसांनी आवळल्या मुसक्या, नेमकं काय प्रकरण?