पुणे : विमानसेवा देणाऱ्या एका कंपनीच्या सेवेत काही त्रुटी असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत असतात. अशातच आता कंपनीकडून प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सेवेसंदर्भात चक्क भाजपच्याच एका पदाधिकाऱ्याने तक्रार केली आहे. आणि तेही थेट केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे.
संबधित कंपनीने विमान प्रवासात पत्नीला माझ्या शेजारचे आसन दिले नाही. विमान कंपनीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सुविधांचा दर्जा किती खालावलेला आहे. कंपनीच्या सेवेत अनेक त्रुटी असल्यामुळे प्रवाशांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. कंपनीचे अधिकारी, कर्मचारी प्रवाशांना सहकार्य न करता उलट ‘कोणाकडे तक्रार करायची त्यांच्याकडे करा’, असे उत्तर देत आहेत. त्यामुळे कार्यतत्पर मंत्री म्हणून लक्ष घालावे’, अशी विनंती पदाधिकारी आणि प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे.
संबंधित कंपनीच्या विमानातून प्रवास करताना आलेले अनुभव संदीप खर्डेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांना पत्र लिहून कळविले आहेत. विमानातून प्रवास करताना आसन व्यवस्था चांगली नसते. प्रवाशांच्या बॅगची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही. विमान कंपनीचे पोर्टर प्रवाशांच्या बॅगेजची योग्य पद्धतीने हाताळणी करत नाहीत. त्यामुळे बॅग खराब होतात तसेच काही चोरीच्या घटना देखील घडल्या आहेत.
आणखी काय लिहलं पत्रात?
“लांबच्या प्रवासात पती आणि पत्नीला जवळची आसन न देता वेगवेगळ्या ठिकाणचे आसन क्रमांक दिले जातात. याचा अनुभव मुंबई ते नैरोबी प्रवासात स्वतःला देखील आला. विमानतळावर चेक इन करताना पती-पत्नीला वेगवेगळ्या सीट दिल्या जातात. या प्रवासात पत्नीला वेगळ्या ठिकाणचे आसन क्रमांक दिले. जवळजवळ आसन देण्याची विनंती कंपनीच्या प्रतिनिधींना केली असता ‘मी काही करू शकत नाही, तुम्हाला कुठे तक्रार करायची ते करा, सह प्रवाशांशी बोलून जागा बदलून घ्या’ अशी उलट उत्तरे देण्यात आली.”
“या विमान कंपनीचे कोणतेही कर्मचारी प्रवासा दरम्यान मराठीत बोलत नाहीत. तसेच त्यांच्याकडून विमानात दिल्या जाणाऱ्या माहितीसाठी देखील मराठी भाषेचा वापर केला जात नाही. किमान महाराष्ट्रात येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानात एका कर्मचाऱ्याने तरी मराठी बोलावे, अशी अपेक्षा आहे. याबाबतही संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य त्या सूचना कराव्यात”
महत्वाच्या बातम्या
-आधी काचेचे तुकडे आता अंडाभुर्जीत झुरळ; गुडलक कॅफेतील आणखी एक धक्कादायक प्रकार
-प्रियकराला फसवणे युवतीला पडले महागात, पोलिसांनी चक्र फिरवली; अत्याचाराचा बनाव अंगलट
-पालिकेच्या तृतीयपंथी सुरक्षारक्षकांना कित्येक महिने वेतनच नाही, थकलेला पगार मिळेल की नाही?
-वैष्णवी हगवणेच्या मृत्यूचं धक्कादायक कारण आलं समोर; चौकशी समतीच्या अहवालाने खळबळ
-‘ही बॅटरी लवकरच संपणार’, शिंदेसेनेनं आदित्य ठाकरेंना डिवचलं