पुणे : पुणे शहरामध्ये जगातील सर्वात मोठे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले होते. त्यानंतर शहरात अजूनही अंमली पदार्थांची खरेदी विक्री अद्याप बंद झाली नाही. त्यातच आता पुणे विमानतळावर कस्टम्स अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली असून एका प्रवाशाकडून तब्बल १०.४७ किलोग्रॅम हायड्रोपोनिक वीड (मारिजुआना) जप्त केले आहे. या मादक पदार्थांची बेकायदेशीर बाजारातील किंमत अंदाजे १०.५ कोटी रुपये आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनव अमरनाथ यादव असं या आरोपीचे नाव असून यादव हा मुळचा उत्तर भारतातील आहे. अभिनव हा २४ जुलै रोजी बँकॉकहून थेट पुण्यात आला. इंडिगो विमानातून आलेल्या प्रवाशाचा हालचाली सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्यांना संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी त्याला अडवून त्याची चौकशी केली. तसेच कस्टम्स अधिकाऱ्यांनी त्याच्या सामानाची तपासणी केली असता त्यामध्ये १०.४७ किलोग्रॅम हायड्रोपोनिक गांजा (मारिजुआना) आढळून आला. या प्रकरणी NDPS कायदा, १९८५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडीसाठी मजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले आहे.
सीमा शुल्क विभागाने अभिनव यादवला अटक करुन न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पुणे कस्टम्सचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून मादक पदार्थांच्या तस्करीमागील संभाव्य आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा शोध घेत आहेत. पुढील तपास सुरू आहे.
महत्वाच्या बातम्या
-पुण्यातील भाजप मंत्र्याची ‘ताईगिरी’, शिंदेंच्या मंत्र्यावर सर्जिकल स्ट्राईक
-दारुचे १० रुपये कमी दिले म्हणून डोक्यात फोडली बिअरची बाटली, व्हिडीओ व्हायरल झाला अन्….
-मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ‘महारक्तदान शिबिर’; १०१४ युनिट रक्त संकलित