पुणे : पुणे शहरामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून दहशतवाद, हत्या, लैंगिक अत्याचार, अपहरण अशा प्रकारच्या गुन्ह्यांनी उच्चाक गाठला आहे. अशातच सायबर चोरट्यांही शहरात काह कमी नाही. शहरातील बालेवाडी परिसरातील एका महाविद्यालयीन तरुणीची अशीच सायबर चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) कारवाईची भीती दाखवून एका महाविद्यालयीन तरुणाची सायबर चोरट्यांनी ४२ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बाणेर पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका तरुणाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार तरुण बालेवाडी भागात राहायला आहे. तो पुण्यात शिक्षणासाठी आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संपर्क साधला होता. दिल्लीती सीबीआय कार्यालयातून अधिकारी बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली होती. चोरट्यांनी तरुणाकडे आधारकार्डबाबत विचारणा केली. ‘तुमच्या नावाच्या आधारकार्डचा कोणीतरी वापर करत आहे. आधारकार्डचा वापर करुन वेगवेगळ्या प्रकारचे ५० गुन्हे करण्यात आले आहेत. याप्रकरणात सीबीआयकडून कारवाई करण्यात येणार आहे’, अशी भीती चोरट्यांनी तरुणाला दाखविली. त्यानंतर कारवाई न करण्यासाठी तातडीने पैसे भरावे लागतील, असं चोरट्यांनी सांगितलं.
गेल्या ५ ते ६ महिन्यात चोरट्यांनी तरुणाला धमकावून वेळोवेळी पैसे घेतले. तरुणाने वेगवेगळ्या बँक खात्यात ४२ लाख ९५ हजार रुपये जमा केले. चोरट्यांनी त्यांच्याकडे आणखी रक्कम मागितली. अखेर घाबरलेल्या तरुणाने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार नोंदविली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
-प्रतीक्षा संपली! उद्याच जाहीर होणार इयत्ता बारावीचा निकाल; ‘या’ वेबसाईटवर पाहता येणार
-भाजपच्या शहराध्यक्षाचं नाव ठरलं, मुहूर्तही ठरला; कोणाच्या गळ्यात पडणार माळ?
-‘काश्मीर सोडून देशात हल्ल्याआडून राजकारण केलं जातंय’; काश्मीरच्या माजी अर्थमंत्र्यांचं वक्तव्य
-आता मुंबईचे हेलपाटे थांबणार, वैद्यकीय मदतीसाठी जिल्हास्तरावरच अर्ज करण्याची सुविधा