पुणे : खराडी येथील उच्चभ्रू परिसरात शनिवारी मध्यरात्री पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर छापा टाकला. बंद फ्लॅटमध्ये ‘हाउस पार्टी’च्या नावाखाली आयोजित या पार्टीत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, दारू आणि हुक्काचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून, त्यांनी घटनास्थळावरून अमली पदार्थ, हुक्का सेट्स आणि विविध विदेशी दारू जप्त केली.
या पार्टीत तीन महिला आणि दोन पुरुष सहभागी होते. तपासातून असे दिसून आले की, या रेव्ह पार्टीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पतीही उपस्थित होते, त्यामुळे या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खराडीतील एका आलिशान फ्लॅटमध्ये ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.
ताब्यात घेतलेल्यांमध्ये दोन महिला आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या रेव्ह पार्टीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. मोठ्या नेत्याच्या जावयाचा सहभाग आढळल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
पोलिसांनी छापेमारीदरम्यान मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, गांजा, दारू आणि हुक्क्याचा साठा जप्त केला. या कारवाईने पुण्यातील उच्चभ्रू वर्तुळात खळबळ उडाली आहे. या रेव्ह पार्टीत सहभागी असलेल्यांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहीणी खडसेंच्या पतीचा समावेश असल्याने या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या
-अध्यक्षांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत महिलाराज; मोहोळांच्या गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य निर्णय
-राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित
-पुणे विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई; १० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त
-पुण्यातील भाजप मंत्र्याची ‘ताईगिरी’, शिंदेंच्या मंत्र्यावर सर्जिकल स्ट्राईक