पुणे : आता पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या १० पास विद्यार्थ्यांसाठी पालिकेने शैक्षणिक अर्थसहाय्य योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून १० उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे.भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजना (इ. १० वी) ही योजना पालिकेकडून राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून १० वी पास असलेला विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी जास्तीत जास्त १५ हजार रुपये अनुदान मिळवू शकतो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी काय आहेत?
- विद्यार्थी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवासी असावा.
- खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ८०% गुण, मागासवर्गीय/रात्रशाळा/मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ७०% गुण, ४०% पेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा कचरा वेचक/बायोगॅस प्रकल्पावरील कामगारांच्या पाल्यासाठी ६५% गुण आवश्यक.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा कराल?
या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. dbt.pmc.gov.in या वेबसाईटवर भरावा लागणार आहे.
आवश्यक कागदपत्रे (बोर्ड मार्कशीट, टक्केवारी प्रमाणपत्र) अपलोड करावीत.
(https://www.pmc.gov.in/educational-schemes/educational-schemes-mr.html)
(https://marathicorner.com/abdul-kalam-yojana-for-10th-12th-pass-students.html
(https://www.pmc.gov.in/mr/backward-class-welfare-scheme-0)
महत्वाच्या बातम्या
-PMC: महिला अधिकाऱ्याला त्रास देणारा भाजप पदाधिकारी कोण? बड्या नेत्यासोबत उठबस, कारवाई होणार का?
-पुणेकरांनो, बकरी ईद निमित्त शहरातील हे रस्ते असणार बंद; पहा कोणते पर्यायी मार्ग
-दादांच्या कार्यकर्त्यांना हवाय साहेबांचा आशिर्वाद; पुण्यात झळकले बॅनर्स