पुणे : पुण्यातील खराडी उच्चभ्रू परिसरामध्ये रेव्ह एका पार्टीवर शनिवारी रात्री पोलिसांनी धाड टाकत कारवाई केली. या करावाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी आता महत्वाची अपडेट समोर आली आहे. आरोपींना अटक केल्यानंतर सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यप्राशन केल्याचं प्राथमिक अहवालातून समोर आले आहे.
सर्व आरोपींची ससून रूग्णालयात वैदयकीय तपासणी करण्यात आली असून आता या तपासणीचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. यामध्ये सात पैकी दोघांनी मद्यपान केल्याचा प्राथमिक अहवाह पोलीसांनी दिला आहे. सातपैकी कोणी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का? हे मात्र न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
प्रांजल मनिष खेवलकर (वय 41), निखिल जेठानंद पोपटाणी ( वय 35), समीर फकीर महमंद सय्यद (वय 41), सचिन सोनाजी भोंबे (वय 42) श्रीपाद मोहन यादव (वय 27), ईशा देवज्योत सिंग (वय 23), प्राची गोपाल शर्मा (वय 22), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पुणे पोलीसांनी अटक केल्यानंतर प्रांजल खेवलकर आणि इतर सहा जणांना पुणे पोलीसांनी अटक केली. सर्व आरोपींना काल न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी प्रांजल खेवलकरसह सातही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
महत्वाच्या बातम्या
-पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
-अमली पदार्थ अन् विदेशी मद्य, पोलिसांच्या छाप्यात खडसेंच्या जावई जाळ्यात, नेमकं काय घडलं?
-अध्यक्षांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत महिलाराज; मोहोळांच्या गणेशोत्सव मंडळाचा स्तुत्य निर्णय
-राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित
-पुणे विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई; १० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त