Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

३ महिन्यांपूर्वी दारुन पराभव, शिंदेसेनेत जाताच लागले आमदारकीचे डोहाळे, उत्साही कार्यकर्त्यांची बॅनरबाजी

by News Desk
March 13, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Ravindra Dhangekar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस हात सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेने प्रवेश केला. ३ महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयाचा आत्मविश्वास असणाऱ्या धंगेकरांचा दारुन पराभव झाला. धंगेकर चर्चेत राहण्यासाठी नेहमीच सोशल मीडियावर अ‌ॅक्टीव्ह असायचे. मात्र, विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशामुळे ते काहीसे थंडावल्याचे पहायला मिळाले होते. धंगेकर गेल्या काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेसेनेत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली होती. त्यानंतर अखेर ३ दिवसांपूर्वी त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशावरुन अनेकांनी त्यांच्यावर टीका केल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘धंगेकर काय होतास तू?… काय झालास तू…’ असे म्हणत टीका केली. तर शहराध्यक्ष अरविंद शिंदेंनी तर थेट ‘पुण्याचा वाल्मिक कराड’ म्हणत सडकून टीका केली. एकीकडे धंगेकरांवर टीकांचं सत्र सुरु आहे तर दुसरीकडे धंगेकर समर्थकांना विधान परिषद आमदारकीचे वेध लागल्याचे पहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपच्या हेमंत रासने यांच्याकडून रवींद्र धंगेकरांचा दारुन पराभव झाला. विधानसभा काँग्रेस पक्षाकडून लढल्यानंतर धंगेकरांनी आता शिंदेसेनेचा वाट धरली आहे. पक्षप्रवेश होताच धंगेकरांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात बॅनर झळकले आहेत. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पुण्यातील शिंदेगटातील कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता असल्याचे सांगितले जात आहे. पण आता ‘कसब्यात जनतेच्या मनातील आमदार’ अशा मजकुराचे बॅनर काही उत्साही कार्यकर्त्यांनी लावल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेना पक्षात पक्षप्रवेश करताच कसबा मतदारसंघातील रवींद्र धंगेकर यांच्या समर्थकांकडून वाढदिवसानिमित्त ही बॅनरबाजी होताना दिसत आहे.

You might also like

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. महाविकास आघाडीच नाही तर महायुतीतील नेत्यांनी देखील धंगेकरांवर टीका केल्याचे पहायला मिळाले आहे. धंगेकरांच्या पक्षप्रवेशाला पहिल्यांदा भाजप आमदार, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोध दर्शवला होता. तसेच पक्षप्रवेशावर बोलताना धंगेकरांनी अर्थमंत्री अजित पवारांबद्दल वक्तव्य केलं. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी धंगेकारांच्या कारनाम्यांची कुंडलीच माध्यमांसमोर मांडल्याचे पहायला मिळाले.

‘धंगेकर स्वतः ४ दरवाजे फिरून शिंदे गटात प्रवेश केला. अजितदादांबद्दल बोलण्याची त्यांची लायकी आहे का? आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले, त्यावेळी अजितदादांच्या पाया पडून विनंती करून राष्ट्रवादीची मदत घेऊन गद्दार निवडून आले, नंतर सरड्यासारखे रंग बदलायला लागले. अजित पवार ज्या दिवशी डोक्यावर पाय देतील त्यावेळी कळेल. दादांच्या बाबतीत चुकीचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता सहन करणार नाही. नाही तर एक दिवस तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही’, असा इशारा दिपक मानकरांनी रवींद्र धंगेकरांना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आमदाराच्या मामाला संपवण्यापूर्वी जादूटोणा अन् मंत्रतंत्र; पुण्यातील धक्कादायक प्रकार उघड

-हप्ते वसूल करून आंदोलन… राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी धंगेकरांची कुंडलीच काढली

-स्वारगेट प्रकरणात धक्कादायक अपडेट; पीडितेला 7500 रुपये दिलेच नाहीत, नेमकं काय प्रकरण?

-कुख्यात गुंड गजा मारणेची सांगलीच्या कारागृहात रवानगी; नेमकं कारण काय?

-शिंदेंना पुण्यात दुसरी लॉटरी; धंगेकरांनंतर आता ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या गळाला

Tags: AssemblyChandrakant Patildeepak mankarHarshvardhan SapkalLegislative CouncilRavindra Dhangekarचंद्रकांत पाटीलदीपक मानकररवींद्र धंगेकरविधान परिषदविधानसभाहर्षवर्धन सपकाळ
Previous Post

आमदाराच्या मामाला संपवण्यापूर्वी जादूटोणा अन् मंत्रतंत्र; पुण्यातील धक्कादायक प्रकार उघड

Next Post

पुणेकरांच्या हितासाठी जगदीश मुळीकांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

News Desk

Related Posts

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Next Post
jagdish Mulik

पुणेकरांच्या हितासाठी जगदीश मुळीकांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली 'ही' महत्वाची मागणी

Recommended

Ganesh Visarjan

बाप्पा निघाले गावाला! दुपारचे २ वाजले तरी मिरवणूक काही संपेना

September 18, 2024
अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष: जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची वेळ

अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष: जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेची वेळ

June 25, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved