पुणे : भाजपमध्ये केंद्र तसेच राज्य पातळीवर संघटनात्मक बदलाचे वारे वाहत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहाराध्यक्ष बदलाची मोठी चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मंडल अध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतर आता शहर आणि जिल्हाध्यक्ष निवडीसाठी मतदान प्रक्रिया देखील घेण्यात आली आहे. त्यानंतर आता शहर आणि जिल्हाध्यक्षांची नाव निश्चित करण्यात आली असून ती नावे जाहीर करण्याचा मुहूर्त देखील ठरला आहे.
पुणे शहराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये सध्याचे शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, गणेश बिडकर, राजेंद्र शेळीकर,गणेश घोष, राजेश पांडे यांची नावं आहे. महिलांमध्ये माजी नगरसेविका वर्षा तापकीर, आरती कोंढरे, वर्षा डहाळे यांची नावे रेसमध्ये आहेत . मात्र या नावांमध्ये गणेश बिडकर आणि श्रीनाथ भिमाले यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे. मात्र काही कार्यकर्ते वरिष्ठांकडून गणेश बिडकर यांचं नाव शहराध्यक्ष पदासाठी फायनल झाला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात जाहीर कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, भाजपकडून शहराध्यक्षपदासाठीच्या नावाची घोषणा करण्याची औपचारिकता बाकी असल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून राज्यातील ७८ शहर आणि जिल्हा अध्यक्षांची नावे एकाच वेळी जाहीर करण्यात येणार आहेत. या शहर आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी काही दिवसांपूर्वी भाजपने परिवेक्षकांची नियुक्ती केली होती.
महत्वाच्या बातम्या
-‘काश्मीर सोडून देशात हल्ल्याआडून राजकारण केलं जातंय’; काश्मीरच्या माजी अर्थमंत्र्यांचं वक्तव्य
-आता मुंबईचे हेलपाटे थांबणार, वैद्यकीय मदतीसाठी जिल्हास्तरावरच अर्ज करण्याची सुविधा
-पुणेकरांची पाणी कपातीतून सुटका नाही; सोमवारपासून ‘या’ भागांमध्ये पाणी कपात लागू
-दत्ता गाडेच्या गुगल हिस्ट्रीतून धक्कादायक माहिती; तब्बल २२ हजार अश्लील व्हिडीओ….