पुणे : शहरातील मुख्य बसस्थानक असणाऱ्या स्वारगेट बस डेपोमध्ये एका शिवशाहीमध्ये २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना गेल्या काही दिवसांपूर्वी उघडकीस आली. या प्रकरणाने संपूर्ण शहरच नाही तर राज्य हादरून गेले. या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयामध्ये पहिल्या सुनावणीनंतर आरोपीच्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना ‘आरोपीने पीडित तरुणीच्या सहमतीने शारीरिक संबंध ठेवले असून आरोपीकडून तिने ७५०० रुपये घेतले’, असे न्यायालयामध्ये सुनावणी झाली असल्याचे आरोपीच्या वकिलांनी सांगतले आहे. त्यावरुन या प्रकरणाला वेगळे वळण लागले आणि पीडित तरुणीवर अनेक आरोप करण्यात आले. त्यातच या प्रकरणी धक्कादायक अपडेट समोर आली आहे.
आरोपीने पीडित तरुणीला ७५०० रुपये दिले, हा मुद्दा न्यायालयाच्या पहिल्या सुनावणीमध्ये उपस्थित केलाच नाही, त्या मुद्द्याची नोंद न्यायालयाच्या रेकॉर्डवरही नाही तो मुद्दा आरोपीच्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना याबाबत सुनावणीमध्ये उपस्थित झाल्याचे भासवले. मात्र, आता याच वकील सुमित पोटे यांनी या आज माध्यमांशी बोलताना धक्कादायक कबुली दिली आहे. ‘याप्रकरणातील पीडित तरुणीला आरोपीने ७५०० रुपये दिले, अशी माहिती न्यायालयात दिलीच नव्हती’ अशी कबुली दिलीच नसल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला मोठा ट्विस्ट आला असून मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, आरोपीच्या वकिलांना माध्यमांनी आज घेरलं आणि ७५०० रुपये दिल्याचे असल्याचं आपण न्यायालयामध्ये न सांगता माध्यमांना खोटी माहिती का दिल्याचे विचारले असता आरोपीच्या दोन्हीही वकिलांची माध्यमांसमोर चांगलीच बोबडी वळल्याचं पहायला मिळालं. साडेसात हजार रुपयांचा दावा आरोपींच्या वकिलांनी न्यायालायात केलाच नाही फक्त माध्यमांना तशी सुनावणी झाली असल्याचं भासवलं. तसेच जर न्यायालायामध्ये दावा केलाच नाही तर माध्यमांसमोर येऊन बोलणं नैतिक आहे का? पत्रकारांच्या या प्रश्नावर बोलताना आरोपीच्या वकिलांची भांबेरी उडाल्याचं स्पष्ट पहायला मिळालं. तसेच आरोपीच्या कुटुंबासोबत या संपूर्ण प्रकरणी सविस्तर पत्रकार परिषद लवकरच घेणार असल्याचं सांगत वकिलांनी माध्यमांसमोरून पळ काढला.
सध्या २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी दत्ता गाडेला आज पुणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची (२६ नोव्हेंबर पर्यंत) न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज पुणे सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडल्यानंतर आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांनी माध्यमांना माहिती देत त्यांनी केलेल्या वक्तव्याची कबुली दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कुख्यात गुंड गजा मारणेची सांगलीच्या कारागृहात रवानगी; नेमकं कारण काय?
-शिंदेंना पुण्यात दुसरी लॉटरी; धंगेकरांनंतर आता ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या गळाला
-स्वारगेट डेपो प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर; महिला प्रवासी स्टँडमध्ये असताना मध्यरात्री अचानक…
-हलाल, झटका मटणावरुन राजकारणात मोठा वाद; ‘मल्हार’ सर्टिफिकेशनवरून जेजुरी संस्थान विश्वस्तांचा विरोध
-‘त्यांनी अजितदादांना जेलच्या दारावर बसवलं होतं’; धंगेकर हे काय बोलून गेले?