पुणे : शहरातील विमानतळ परिसरात ‘व्हिक्टोरिया थाई स्पा’ नावाच्या मसाज सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली परदेशी महिलांकडून देहविक्री करवून घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि गुन्हे शाखा युनिट ४ च्या पोलिसांनी ही बेकायदेशीर कारवाई उघडकीस आणली. सोमवारी २१ जुलै रोजी केलेल्या कारवाईत एका भारतीय महिलेसह चार परदेशी महिलांची सुटका करण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, त्यांनी विमानतळ परिसरातील सेंटर ईडन पार्क बिल्डिंगमधील या स्पा सेंटरवर छापा टाकला. प्रथम बनावट ग्राहक पाठवून माहितीची खात्री केल्यानंतर पोलिसांनी विशेष पथकाद्वारे कारवाई केली. यात दोन स्पा व्यवस्थापक आणि एका मालकाला अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १४३, ३ (५) आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या कलम ३, ४, ५ व ७ अंतर्गत विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईदरम्यान पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली, ज्यात चार परदेशी आणि एक भारतीय महिलेचा समावेश आहे. त्यांना सुरक्षितपणे महिला पुनर्वसन गृहात पाठवण्यात आले. ही कारवाई पोलीस उपआयुक्त (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस फौजदार आणि इतर कर्मचाऱ्यांनी पार पाडली.
पुणे शहरात मसाज सेंटरच्या आड अशा अवैध व्यवसायांचे प्रमाण वाढत आहे. परदेशी महिलांची मानसिक आणि आर्थिक फसवणूक करून त्यांना देहविक्रीसाठी भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यामुळे अशा केंद्रांवर सातत्यपूर्ण आणि कठोर कारवाईची आवश्यकता आहे.
महत्वाच्या बातम्या
-पत्नीला शेजारची सीट नाही दिली म्हणून भाजप पदाधिकाऱ्याने थेट केंद्रीय राज्यमंत्र्याकडे केली तक्रार
-आधी काचेचे तुकडे आता अंडाभुर्जीत झुरळ; गुडलक कॅफेतील आणखी एक धक्कादायक प्रकार
-प्रियकराला फसवणे युवतीला पडले महागात, पोलिसांनी चक्र फिरवली; अत्याचाराचा बनाव अंगलट
-पालिकेच्या तृतीयपंथी सुरक्षारक्षकांना कित्येक महिने वेतनच नाही, थकलेला पगार मिळेल की नाही?
-वैष्णवी हगवणेच्या मृत्यूचं धक्कादायक कारण आलं समोर; चौकशी समतीच्या अहवालाने खळबळ