Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पब ड्रग्ज मिळण्याचे अड्डे, सरकार या संस्कृतीला पाठिंबा देतंय; रविंद्र धंगेकर आक्रमक 

by News Desk
February 22, 2024
in Pune, पुणे शहर
पब ड्रग्ज मिळण्याचे अड्डे, सरकार या संस्कृतीला पाठिंबा देतंय; रविंद्र धंगेकर आक्रमक 
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरात ड्रग्ज प्रकरण काही थंड होत नाही. या प्रकरणाचे जसे धागेदोरे सापडत आहेत तसे पुणे पोलिसांकडून तपास केला जात आहे आणि नवी माहिती समोर येत आहे. विविध भागात ड्रग्ज साठा जप्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी आपली प्रतिक्रिया देत असताना सरकारवर आणि पुणे पोलिसांवर गरळ ओकली आहे. रविंद्र धंगेकर यांनी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामध्ये विधानसभेमध्ये आवाज उठवला होता. त्यातच आता ड्रग्ज प्रकरणी धंगेकरांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आणि गंभीर आरोपही केले आहेत.

“दोन दिवसांपूर्वी शहरांमध्ये मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा खुलासा झालाय. यामध्ये शहराच्या मध्यवर्ती परिसरातील सोमवार पेठ भागातील एका व्यक्तीला पोलिसांनी पकडले आहे. त्याची चौकशी केल्यानंतर कुरकुंभ एमआयडीसी मधील कारखाना उघडकीस आला असून, या मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा खुलासा झाला आहे. आतपर्यंत पोलीस प्रशासन काय करत होतं?” असा सवाल यावेळी धंगेकरांनी उपस्थित केला आहे.

You might also like

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

“मी ललित पाटील प्रकरणाबाबत वारंवार पोलिसांशी बोलत आलो आहे. तरीदेखील राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास पूर्णपणे केलेला नाही. या प्रकरणामध्ये संजीव ठाकूर यांनी ज्या पद्धतीने ललित पाटील याला ससून रुग्णालयामध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न केले. या प्रकरणामधील बाकीच्या लोकांना अटक करण्यात आली. मात्र, संजीव ठाकूर यांना सरकारने पाठीशी घालत अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही”, असा आरोप धंगेकरांनी केला आहे.

“सध्याचे सरकार हे याच संस्कृतीला पाठिंबा देत असून, यामुळे तरुण वाईट मार्गाला लागत आहेत. ललित पाटील प्रकरणादरम्यान मी पोलिसांना ड्रग्ज रॅकेटमध्ये आंतरराष्ट्रीय टोळ्या कार्यरत असल्याच्या शक्यतेबाबत कल्पना दिली होती. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्र पंजाबनंतर ज्या अमली पदार्थामुळे व्यसनाधीन होत असल्याबाबतची कल्पना पोलिसांना दिली होती. हे ड्रग्ज रॅकेट सोमवार पेठपर्यंत पोहोचले असून, एक नाहीतर अनेक ललित पाटील यामध्ये सक्रिय आहेत”, असंही रविंद्र धंगेकर म्हणाले आहेत.

“पुण्यामध्ये पब संस्कृती वाढत असून, हे पब ड्रग्ज मिळण्याचे अड्डे बनले आहेत. पोलिसांना त्यामध्ये हप्ते मिळणार आहेत. पब संस्कृती पुण्यात नसावी. हे पुणेकरांचं मत आहे तेच माझंही आहे. इतके मोठे रॅकेट पुणे परिसरामध्ये सुरू असताना याचा साधा सुगावा पोलिसांना न लागवा हे पोलिसांचे अपयश असून, पोलिसांकडून ड्रग्ज प्रकरणाचा तपास संथ गतीने सुरू आहे” असे रविंद्रे धंगेकर म्हणाले आहेत.

हुक्का पार्लरच्या नावाखाली अमली पदार्थ मिळतात. येत्या २ दिवसांत हुक्का पार्लर बंद झाले नाही तर मी माझ्या कार्यकर्त्यांसोबत जाऊन हुक्का पार्लर बंद करणार, होणाऱ्या परिणामाला पोलीस जबाबदार असतील, याची पोलिसांनी नोंद घ्यावी, असा इशारा रविंद्र धंगेकरांनी सरकार आणि पुणे पोलिसांना इशारा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राजकारणात नवा ट्विस्ट: पवार घराण्यातील आणखी एका वारसदाराची राजकारणात एन्ट्री! शहरात बॅनरची चर्चा

-नसांच्या दुर्लक्षित स्थितीच्या उपचारांसाठी मणिपाल हॉस्पिटल खराडीने सुरु केले ‘स्पेशलाईझ्ड क्लिनिक’

-‘पुण्यात फडणवीस किंवा कोणी वरिष्ठ नेता ही निवडणूक लढो, जिंकणार मीच’- रविंद्र धंगेकर

-पुणे ड्रग्स रॅकेट प्रकरणाचे ‘कोडवर्ड’ आले समोर; ‘लंबा बाल’, ‘मुंबई बंदर’ आणि ‘न्यू जॉब पुणे’

-सदाशिव पेठेतील जिममधील सामानाची चोरी; ७३ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी

Tags: CongressDrug RacketDrugsKasbaLalit PatilMLApune policeRavindra Dhangekarआमदारकसबाकाँग्रेसड्रग्जड्रग्ज रॅकेटपुणे पोलीसरविंद्र धंगेकरललित पाटील
Previous Post

राजकारणात नवा ट्विस्ट: पवार घराण्यातील आणखी एका वारसदाराची राजकारणात एन्ट्री! शहरात बॅनरची चर्चा

Next Post

“पालकमंत्र्यांनी पुण्याच्या गुन्हेगारीत लक्ष घालावं, या गृहमंत्रीच जबाबदार”; रोहित पवारांचा गंभीर आरोप

News Desk

Related Posts

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

"पालकमंत्र्यांनी पुण्याच्या गुन्हेगारीत लक्ष घालावं, या गृहमंत्रीच जबाबदार"; रोहित पवारांचा गंभीर आरोप

Recommended

Maratha Morcha

पुण्यात धडकले मराठ्यांचे वादळ, मस्साजोग प्रकरणी विराट जनआक्रोश मोर्चा

January 5, 2025
धंगेकरांना उमेदवारी, वसंत मोरेंचं व्हॉट्स अ‌ॅप स्टेटस चर्चेत; ‘एकदा ठरलं की ठरलं’

Pune Lok Sabha | ‘मोरेंना पाठिंबा देण्यापेक्षा पक्षाचा उमेदवार द्या’; वंचितच्या नेत्यांचाही मोरेंना विरोध

April 2, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved