पुणे : विद्येचे माहेरघरं असणाऱ्या पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. पुण्यातील एका रिक्षा चालकाने प्रवासी तरुणीला फोन करुन अश्लील व्हिडीओ पाठवून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने हडपसर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन, पीडित तरुणीने वाघोली ते विमाननगर असा रिक्षातून प्रवास केला होता. त्यावेळी त्या तरुणीने रिक्षाचे २० रुपये भाडे गगुल पे व्दारे दिले. यामुळे तिचा मोबाईलनंबर हा रिक्षा चालकाकडे गेला. त्यानंतर रिक्षा चालकाने तिच्या मोबाईलवर अश्लिल व्हिडिओ आणि मेसेज पाठवले. आरोपी रिक्षाचालक एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तरुणीला व्हिडिओ कॉल करुन अश्लिल बोलण्याचा प्रयत्न देखील केला. त्यानंतर त्याचा अश्लिल फोटोही त्याने तरुणीला पाठवला. हे घडल्यानंतर पीडित तरुणीने आरोपीचा नंबर ब्लॉक केल्यावर त्याने दुसऱ्या मोबाईलवरुन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यानंतर तरुणीने हडपसर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि संबंधित रिक्षा चालकाविरोधात तक्रार दिली आहे.
दरम्यान, सध्या पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महिला अत्याचाराच्या घटना पाहता पुणे, विद्येचं माहेरघर मुली, महिलांसाठी असुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. स्वारगेट बस स्थानकामध्ये फेब्रुवारी महिन्यात घडलेल्या घटनेतील आरोपी दत्ता गाडे याला अद्याप शिक्षा सुनावली गेली नाही. दत्ता गाडे हा कारागृहात असून पुणे सत्र न्यायालयामध्ये या प्रकरणी निर्णय अद्याप प्रलंबित आहे.
महत्वाच्या बातम्या
-दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘गोकुळ’नं दुधाच्या दरात केली इतक्या रुपयांची वाढ
-सायबर गुन्ह्यात वाढ: ‘सीबीआय’च्या कारवाईची भीती दाखवत महाविद्यालयीन तरुणीची लाखोंची फसवणूक
-प्रतीक्षा संपली! उद्याच जाहीर होणार इयत्ता बारावीचा निकाल; ‘या’ वेबसाईटवर पाहता येणार
-भाजपच्या शहराध्यक्षाचं नाव ठरलं, मुहूर्तही ठरला; कोणाच्या गळ्यात पडणार माळ?