Thursday, July 31, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Entertainment

‘छावा’ चित्रपटाच्या दिग्दर्शकांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, गणोजी शिर्केचे वंशज आक्रमक, नेमकं कारण काय?

by News Desk
February 21, 2025
in Entertainment, पुणे शहर, सांस्कृतिक
Chaava
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : छत्रपती संभाज महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हिंदी चित्रपटामध्ये बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने छत्रपती शंभूराजांची भूमिका साकारली आहे. या सिनेमाला भारतभर मोठा प्रतिसाद मिळत असून परदेशातही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घालत आहे. एकीकडे हा सिनेमा लगोपाठ हाऊसफुल कोट्यावधींची कमाई करत आहे तर दुसरीकडे या सिनेमातील काही प्रसंगांवर पुन्हा एकदा आक्षेप घेण्यात आला आहे.

‘छावा’ चित्रपटाच्या दिग्दर्शकांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी गणोजी शिर्के यांच्या वंशजांनी केली आहे. या चित्रपटात गणोजी शिर्के यांच्या व्यक्तिरेखेचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप करत वंशजांनी आक्षेप घेतला आहे. गणोजी शिर्के यांच्या वंशजांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला इतिहास हा खोटा असून दिग्ददर्शकावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

You might also like

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

“या चित्रपटात इतिहासाची तोडमोड केली असून जाणीवपूर्वक इतिहास बदलून दाखवण्यात आला आहे. जाणीवपूर्वक आमच्या घराण्याला बदनाम केलं जात आहे. षड्यंत्र करत बदनामी केली जात आहे. चुकीचा इतिहास दाखवला गेला असून आमच्या राजे शिर्के घराण्याला टार्गेट केलं गेलं आहे. दिग्दर्शकांनी जो इतिहास दाखवला त्यांच्याकडे असे कोणते पुरावे आहेत? त्यांच्याकडे एकही पुरावा नाही.

“चित्रपट दाखवायच्या आधी यांनी आमच्याशी चर्चा करायला हवी होती की यावर तुमचं मत काय आहे आमचा सल्ला घेतला गेला नाही.
‘छावा’ कादंबरी ज्यांनी लिहिली त्यांची देखील भेट आम्ही घेतली होती. राजे शिर्के घराण्याच खूप मोठं योगदान आहे. आम्ही गद्दारी केली असे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत मग हे आरोप कसे केले जातात?  माहिती अधिकारातही कोणतेही पुरावे सापडले नाहीत. मग यांना कुठून माहिती मिळाली शिर्केंनी गद्दारी केली म्हणून? इतिहास गायब केला जात असून समजता तेढ निर्माण केला जात आहे. आम्ही चित्रपटाच्या विरोधात नाही पण आम्हाला खलनायक करुन सिनेमा प्रदर्शित केला आहे. गणोजी राजे शिर्के यांनी औरंगजेबाला वाट दाखवली नाही”, असे गणोजी शिर्के यांचे वंशज दीपक राजे शिर्के यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

इतिहासाच्या चुकीच्या सादरीकरणामुळे समाजात संभ्रम निर्माण होतो. ‘छावा’ चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड करण्यात आली आहे आणि गणोजी शिर्के यांना खलनायक म्हणून दाखवले गेले आहे, जे ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे आहे. त्यामुळे एकतर गणोजी शिर्केंबद्दल दाखवलेले प्रसंग बदलण्यात यावेत आणि दिग्ददर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिर्के घराण्याने केली आहे.

दरम्यान, हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासून यावर आक्षेप घेण्यात आला होता. छावा चित्रपटाचा ट्रेलर रिलीस झाला त्यावेळी त्यामध्ये छत्रपती शंभू महाराज (विकी कौशल) हे लेझिम खेळताना दाखवण्यात आले होते. यावर काही शिवप्रेमींनी आक्षेप घेत हा सीन कट करण्यास सांगितले. त्यानंतर १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घातला. मात्र आता यावर पुन्हा एकदा आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शिर्के घराण्याने घेतलेल्या आक्षेप आणि गुन्हा दाखल करण्याच्या मागणीबाबत काय होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

महत्वाच्या बातम्या-

-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; जेवणात किडे-अळ्या, व्हिडीओ व्हायरल

-पीएमपीत ‘मराठी भाषा’ बंधनकारक करण्याचे आदेश; कार्यालयीन कामकाज ‘मराठी’तूनच

-शिंदेंची भेट धंगेकरांना महागात, काँग्रेसने महत्त्वाच्या कमिटीत घेणं टाळलं; नेमकं काय घडलं?

-गजा मारणे टोळीची दहशत, केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांच्या माणसाला मारहाण; पुण्यात नेमकं चाललंय काय?

-पालिकेचे पाणी पिण्यास योग्य नाहीच! तपासणीतून कोणती माहिती समोर आली?

Tags: ChhaavaDeepak raje ShirkeGanoji Shirkeगणोशी शिर्केछावादीपक राजे शिर्के
Previous Post

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; जेवणात किडे-अळ्या, व्हिडीओ व्हायरल

Next Post

Pune: बुलेटराजांची पोलिसांनी बंद केली फटफट; थेट सायलेन्सरच केले…

News Desk

Related Posts

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

by News Desk
July 28, 2025
Next Post
Bullet

Pune: बुलेटराजांची पोलिसांनी बंद केली फटफट; थेट सायलेन्सरच केले...

Recommended

बागुल कुटुंबाच्या आदर्शाचा गौरव, जनसेवा फाउंडेशनतर्फे आदर्श एकत्र कुटुंब पुरस्कार 

बागुल कुटुंबाच्या आदर्शाचा गौरव, जनसेवा फाउंडेशनतर्फे आदर्श एकत्र कुटुंब पुरस्कार 

October 11, 2024
‘अजितदादांकडे ५५ गायींचा गोठा’, ‘तुतारीवाले गोठा साफ करायला’; उत्तम जानकर- मिटकरी यांच्यात जुंपली

‘अजितदादांकडे ५५ गायींचा गोठा’, ‘तुतारीवाले गोठा साफ करायला’; उत्तम जानकर- मिटकरी यांच्यात जुंपली

June 8, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved