पुणे : आता दूध उत्पादक शेतकऱ्यांनी देणारी बातमी समोर आली आहे. गोकुळ दुधाच्या दरामध्ये सोमवारपासून २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकीकडे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर दुसरीकडे आता सर्वसामान्यांच्या खिशाचा भार वाढल्याचे पहायला मिळत आहे. गोकुळचे दूध उद्यापासून दोन रुपयांनी महागणार आहे. पुणे आणि मुंबईत म्हैस दूध प्रतिलिटर ७४ रुपये दर होणार आहे. तर कोल्हापूरसह उर्वरित महाराष्ट्रात म्हैस दूध ६८ रुपये प्रतिलिटर होणार आहे.
पुणे, मुंबईत म्हशीचं दूध प्रतिलिटर ७४ रुपये तर उर्वरित महाराष्ट्रात ६८ रुपये प्रतिलिटर असणार आहे. तर गायीच्या दुधात देखील २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मुंबई, पुण्यात ५८ रुपये तर उर्वरित राज्यात ५० रुपये प्रतिलीटर दर होणार आहे. गायीच्या दूध दरात देखील प्रति लिटर दोन रुपयांनी केली वाढ करण्यात आल्याने याचा फायदा राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.
सध्या ‘गोकुळ’ने दुधाच्या दरात वाढ केली असली तरी, अद्याप दुसऱ्या कोणत्या दूध संघाने दरात वाढ केलेली नाही. ते दूध संघ सुद्धा दुधाच्या दरात वाढ करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे. दूध संघानी दर वाढवले तर दूध उत्पादकांना खरंंच मिळणार का? असा सवाल देखील काही शेतकरी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
-सायबर गुन्ह्यात वाढ: ‘सीबीआय’च्या कारवाईची भीती दाखवत महाविद्यालयीन तरुणीची लाखोंची फसवणूक
-प्रतीक्षा संपली! उद्याच जाहीर होणार इयत्ता बारावीचा निकाल; ‘या’ वेबसाईटवर पाहता येणार
-भाजपच्या शहराध्यक्षाचं नाव ठरलं, मुहूर्तही ठरला; कोणाच्या गळ्यात पडणार माळ?
-‘काश्मीर सोडून देशात हल्ल्याआडून राजकारण केलं जातंय’; काश्मीरच्या माजी अर्थमंत्र्यांचं वक्तव्य