पुणे : जगद्गुरु संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यात दाखल झाला आहे. या सोहळ्यासोबत लाखो वारकरी पुण्यात आले आहेत. हे वारकरी लांबचा प्रवास करून येत असल्याने त्यांची सेवा करण्यासाठी अनेक जण पुढे येतात. प्रत्येकजण आपापल्या परिने वारकऱ्यांची काळजी घेतो. यामध्ये मूळचे पुणेकर असलेले, पण सध्या हैदराबाद येथे स्थायिक असलेले अब्दुल रजा गेल्या वीस वर्षांपासून वारकऱ्यांची निस्वार्थपणे सेवा करत आहेत. सर्व जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन ते वारकऱ्यांचे दुखणे कमी करण्यासाठी मालिश करतात.
अब्दुल रजा हे मूळ पुण्याचे असले तरी सध्या ते हैदराबाद येथे राहतात. तरीही दरवर्षी ते पुण्यातील साखळीपीर तालीम मंडळात वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी आवर्जून येतात. अनेक वारकरी त्यांच्या सेवेसाठी खास येतात. अब्दुल यांचे मालिश करण्याचे कौशल्य आणि त्यांचा प्रेमळ स्वभाव यामुळे वारकऱ्यांमध्ये त्यांची विशेष ओळख आहे. त्यांच्या सेवेमुळे वारकऱ्यांना प्रवासातील थकवा आणि दुखणे कमी होण्यास मदत होते. ही सेवा त्यांना केवळ आनंदच देत नाही, तर त्यांच्या व्यवसायाला देखील एक वेगळी ओळख मिळते.
अब्दुल रजा यांच्यासाठी ही सेवा म्हणजे एक प्रकारचा धार्मिक उत्सव आहे. ते म्हणतात, “वारकऱ्यांची सेवा करताना मला समाधान मिळते. माझ्या मालिशच्या तेलामुळे त्यांचे दुखणे कमी होते आणि माझ्या व्यवसायाचीही ओळख वाढते.” सेवा हीच खरी भक्ती, या भावनेने ते गेल्या दोन दशकांपासून अव्याहतपणे वारकऱ्यांची सेवा करत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र आणणारा हा पालखी सोहळा अधिकच अर्थपूर्ण होतो.
महत्वाच्या बातम्या
-पुण्यातील धक्कादायक प्रकार; दारु प्यायचा म्हणून कामावरुन काढून टाकलं, त्याचाच राग मनात धरला अन्…
-आळंदीत कत्तलखाना; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं काय होणार
-‘मनसेसोबत युती केल्यास थोड्या तरी जागा येतील…’; चंद्रकांत पाटलांचा ठाकरेंना टोला
-ज्ञानोबा, तुकोबांच्या पालख्या आज पुण्यात, पालिकेकडून स्वागताची तयारी
-‘तुमचा वस्ताद अजितदादा अन् त्यांनीचं तुम्हाला लंगोट…’, महेश लांडगेंना राष्ट्रवादीचं सडेतोड उत्तर