Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Uncategorized

नाशिक व पुणे विमानतळांसह 58 विमानतळे कृषी उडान योजनेअंतर्गत समाविष्ट

by Team Local Pune
December 12, 2023
in Uncategorized
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

शेतकऱ्यांच्या शेतमालाला देश व विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याकरिता केंद्र शासनाने सकारात्मक पाऊल उचलले असून, नाशिक व पुणे विमानतळासह देशातील एकूण 58 विमानतळांचा केंद्रीय ‘कृषी उडान योजना 2.0’ अंतर्गत समावेश करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभासह त्यांच्या उत्पादनाला जगभरात ओळख मिळेल. नाशिक आणि पुणे विमानतळांचा या योजनेत समावेश झाल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत कमी वेळात आणि कमी खर्चात पोहोचवता येईल, पर्यायाने त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल.

        शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन दूरच्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करणे आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल या उद्देशाने  ऑगस्ट 2020 मध्ये कृषी उडान योजना सुरु करण्यात आली. 

कृषी उडान योजना 2.0 ची घोषणा 27 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात आली. यात प्रामुख्याने: डोंगराळ प्रदेश, ईशान्येकडील राज्ये आणि आदिवासी भागातून विमानतळांद्वारे विविध प्रकारच्या शेतीमाल (फळे, भाज्या, मांस, मासे, डेअरी उत्पादने इ.) वाहतुकीवर भर देऊन या योजनेअंतर्गत ईशान्य , डोंगराळ आणि आदिवासी भागासाठी 25 विमानतळ निवडण्यात आली आहेत, तर इतर भागांमध्ये 33 विमानतळांचा समावेश आहे.

You might also like

ऐकावं ते नवलंच! लग्नाच्या रात्री पत्नीसाठी पान आणायला गेला अन् आल्यावर पाहिलं तर पत्नी…

पुण्यात बनावट नोटांचं रॅकेट! पोलिसांनी जप्त केल्या लाखोंच्या बनावट नोटा

१३९ कोटींचे टेंडर अन् विशिष्ट अटी, लाडक्या ठेकेदारासाठी पीएमसी अधिकाऱ्यांच्या ‘बहुउद्देशीय’ पायघड्या?

या योजनाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कृषी विभाग, नागरी विमान वाहतूक मंत्रालय, पशुपालन आणि डेअरी विभाग, मत्स्य विकास विभाग, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, वाणिज्य विभाग, आदिवासी विकास मंत्रालय आणि पूर्वोत्तर प्रदेश विकास मंत्रालय अशी आठ केंद्रीय मंत्रालये योग्य समन्वय साधून काम करीत आहेत.

हवाई मालवाहतुकीद्वारे कृषी उत्पादनाची वाहतूक सुलभ करुन त्यास प्रोत्साहन देण्यासाठी विमान प्राधिकरण भारत (AAI) व संरक्षण मंत्रालयाने विमानतळ शुल्क, पार्किंग शुल्क इ. सवलती देखील या योजनेअंतर्गत प्रदान केल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना देश-विदेशात जलद आणि सुरक्षितरित्या पोहोचवण्यास मदत होईल व त्यांना उत्पादानाच्या विक्रीतून अधिक उत्पन्न मिळू शकेल, अशी माहिती विभागने दिली आहे.

Tags: agrinashik airportpune airport
Previous Post

प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्या मृत्यूची चौकशी प्रधान सचिवांमार्फत करणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांसाठी 1 हजार 690 कोटी रुपयांचे पीकविम्याचे वितरण – मुंडे

Team Local Pune

Related Posts

marriage
Uncategorized

ऐकावं ते नवलंच! लग्नाच्या रात्री पत्नीसाठी पान आणायला गेला अन् आल्यावर पाहिलं तर पत्नी…

by News Desk
May 28, 2025
पुण्यात बनावट नोटांचं रॅकेट! पोलिसांनी जप्त केल्या लाखोंच्या बनावट नोटा
Pune

पुण्यात बनावट नोटांचं रॅकेट! पोलिसांनी जप्त केल्या लाखोंच्या बनावट नोटा

by News Desk
April 29, 2025
pmc-security-guard-139-crore-tender-scam
Uncategorized

१३९ कोटींचे टेंडर अन् विशिष्ट अटी, लाडक्या ठेकेदारासाठी पीएमसी अधिकाऱ्यांच्या ‘बहुउद्देशीय’ पायघड्या?

by Team Local Pune
April 15, 2025
महापालिकेच्या डांबरात कोणाचे हात काळे? पुण्यात डांबर खरेदीत मोठा गैरव्यवहार
Pune

महापालिकेच्या डांबरात कोणाचे हात काळे? पुण्यात डांबर खरेदीत मोठा गैरव्यवहार

by Team Local Pune
March 27, 2025
Prashant Koratkar
Uncategorized

‘दाखल कलमानुसार अटक करण्याची गरज नव्हती’ कोरटकरच्या वकीलाचा न्यायालयात मुद्दा; असीम सरोदेंचा काय म्हणाले?

by News Desk
March 25, 2025
Next Post

राज्यातील 52 लाख शेतकऱ्यांसाठी 1 हजार 690 कोटी रुपयांचे पीकविम्याचे वितरण - मुंडे

Recommended

Dinanath Hospital

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरण: आरोग्य विभागानं ‘या’ बड्या अधिकाऱ्यावर केली मोठी कारवाई

April 8, 2025
आम्हाला पक्ष, चिन्ह द्यायचं नाही ही एक दडपशाही नाही का? सुप्रिया सुळेंचा भावनिक सवाल

आम्हाला पक्ष, चिन्ह द्यायचं नाही ही एक दडपशाही नाही का? सुप्रिया सुळेंचा भावनिक सवाल

February 20, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक
Pune

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: वाहतूक नियमांत मोठे बदल, असे असेल शनिवार, रविवारचे वेळापत्रक

August 2, 2025
ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?
Pune

ड्रग्स पार्टी प्रकरण: पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट, नेमकं कारण काय?

August 2, 2025
विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved