पुणे : गणेश मंडळातील एक कार्यकर्ता म्हणून आजवर काम करत आलेले भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्या विजयासाठी कसबा मतदारसंघातील मंडळांची वज्रमूठ तयार झाली आहे. आज रासने यांच्या प्रचारार्थ गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्यातीलच एक असणारे हेमंत रासने यांना विधानसभेत पाठवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
लहानपणापासून गणेश मंडळामध्ये सक्रिय असणारे आणि आज राजकीय जीवनात काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम हेमंत रासने यांनी केलं आहे. गणपती मंडळाच्या कार्यकर्त्याला येणाऱ्या अडचणींची एक कार्यकर्ता म्हणून रासने यांना जाणीव आहे. या अडचणी कायदेशीर मार्गाने सोडवण्यासाठी ते सर्वतोपरी मदत करतील, असा विश्वास यावेळी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
यावेळी, प्रसिद्ध कीर्तनकार चारुदत्त आफळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, सुनील रासने, दत्ता सागरे, महेश सूर्यवंशी, मंदार जोशी, विकास पवार, नितीन पंडित, पराग ठाकूर, सौरभ करडे, मंदार परळीकर सूर्यकांत पाठक, शिरीष मोहिते, पियुष शहा, राकेश डाखवे, अजय दराडे, अशोक जाधव, विनायक घाटे, स्वप्नील दळवी, किरण सोनिवाल, कुमार रेणूसे, प्रकाश राऊत उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
-कसब्यात हेमंत रासने यांना वाढते समर्थन, विविध समाज संघटनांकडून पाठिंबा जाहीर
-‘हिंदुत्ववादी सरकार म्हणून समाज अन् देश सुरक्षित’- गोविंद देवगिरी महाराज
-“माझ्या वडिलांचा फोटो लावायचा नाही, तुझ्या त्या…”, शरद पवारांचा फोटो वापरल्याने सुळे आक्रमक
-“बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल”