पुणे : विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक वारसा लाभलेलं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ससून रुग्णालयाशी संलग्न बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये दोन निवासी डॉक्टरांवर रॅगिंग झाल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. थेट मंत्रालय स्तरावर विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी केली तक्रार त्यानंतर चक्र फिरली आणि खडबडून जागे झालेल्या कॉलेज प्रशासनाने मंगळवारी अँटी रॅगिंग समितीची बैठक आयोजित केल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑर्थोपेडिक्स विभागातील पहिल्या वर्षात शिकणाऱ्या या मुलाला त्यांचे दोन सिनिअर्स डीपार्टमेंटमधे डोक्यावरुन कधी गार पाणी ओतून घ्यायला लावायचे, तर कधी गरम पाणी ओतून घ्यायला लावायचे. या मुलाने ही गोष्ट आधी आर्थोपीडीक डीपार्टमेंटचे विभागप्रमुख डॉक्टर गीरीष बारटक्के यांना सांगितली होती. मात्र त्यांनी पुरेशी दखल घेतली नाही, असा या मुलाचा आरोप आहे. त्यानंतर ससून रूग्णालयाचे डीन डॉक्टर एकनाथ पवार यांना देखील हा प्रकार सांगण्यात आला. अनेक दिवस या विद्यार्थ्याला वरिष्ठ डॉक्टरांकडून त्रास होत होता. मात्र, त्याच्या तक्रारीची योग्य दखल कॉलेज पातळीवर घेतली गेली नाही. त्यामुळे संबंधित तक्रारदार विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी याबाबतची तक्रार थेट मंत्रालय स्तरावरती केली.
मंत्रालयाकडे तक्रार केल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची चौकशी सुरु होती. यामध्ये तक्रारदार विद्यार्थ्यांकडून आणि रॅगींग करणाऱ्यांकडून माहिती घेतली आहे. आता या प्रकरणाचा अहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे. या प्रकरणामध्ये दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीच्या अहवालानंतर दोन विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी म्हणजे अभ्यासक्रमाच्या एका टर्मसाठी निलंबीत करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
-सुरेश कलमाडींना क्लीन चीट मिळताच कार्यकर्त्यांचा पुण्यात जल्लोष; कॉमनवेल्थ घोटाळा नेमकं काय प्रकरण?
-पुण्यात बनावट नोटांचं रॅकेट! पोलिसांनी जप्त केल्या लाखोंच्या बनावट नोटा
-मुहूर्त ठरला! अखेर सिंहगड रोडचा उड्डाणपूल होणार खुला