Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

मुहूर्त ठरला! अखेर सिंहगड रोडचा उड्डाणपूल होणार खुला

by News Desk
April 29, 2025
in Pune, पुणे शहर
मुहूर्त ठरला! अखेर सिंहगड रोडचा उड्डाणपूल होणार खुला
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : वाढत्या शहरीकरणामुळे पुणे शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या वाढताना दिसते. अशातच यावर उपाय म्हणून शहरात मेट्रोचे जाळे पसरत आहे तर काही भागांमध्ये उड्डाणपूलांचे काम करण्यात आले आहे. शहरातील सर्वात जास्त वर्दळीचा रस्ता असणाऱ्या उड्डाणपूलावर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पहायला मिळते. या ठिकाणच्या उड्डाणपूलाचे काम पूर्ण होऊन दीड महिना लोटला तरीही हा उड्डाणपूल नागरिकांना वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नव्हता. अखेर या उड्डाणपूलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला आहे.

या उड्डाणपूलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेळ मिळत नसल्याने अखेर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार आहे. येत्या गुरुवारी ०१ मे रोजी उद्घाटन होणार असून महाराष्ट्र दिनी हा उड्डाणपूल पुणेकरांना वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या पुलामुळे राजाराम पूल ते वडगावकडे जाणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

You might also like

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

२०२१ मध्ये या पूलाचे भूमीपूजन झाले होते. या पुलाचे काम पूर्ण होऊन दीड महिना उलटला आहे. या पुलाचे उद्‍घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे सांगण्यात आले होते, पण त्यांची तारीख मिळाली नव्हती. फडणवीस पुण्यात दोन दिवस कार्यक्रमासाठी उपस्थित होते, परंतु या काळातही हा उड्डाणपूल खुला होऊ शकला नाही.

‘त्या’ व्हिडीओनंतर प्रशासनाला जाग

मुंबईपेक्षाही भयानक गर्दी झाल्याचा व्हिडीओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर सिंहगड रोडने प्रवास करणाऱ्या त्रस्त  नागरिकांनी संताप व्यक्त केला. या वाहतूक कोंडीमध्ये नागिरक तब्बल ४ तास अडकून होते. त्यानंतर विरोधकांनी देखील यावर प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर ताशेरे ओढले. त्यानंतर महापालिका प्रशासनाला राज्य सरकारतर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन केले जाईल, असा निरोप देण्यात आला आहे. त्यामुळे आता येत्या २ दिवसांत हा पूल वाहतूकीसाठी खुला होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

-पुणे महापालिकेला मिळाले ‘हे’ नवे अतिरिक्त आयुक्त

-लग्न करतो म्हणत विवाहित प्रेयसीला पुण्यात आणलं, तिच्या मुलीसह तिला बुधवार पेठेत विकलं, न्यायासाठी पोलिसांकडे पण…

-पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये बदलाचे वारे; पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षपदी कोणाची लागणार वर्णी?

-“पाकिस्तानचं पाणी बंद केलंच नाही, सरकार खोटं बोलतंय”; प्रकाश आंबेडकरांचं दाखवलं ‘ते’ पत्र

-परदेशात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांची चिंता मिटली; प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटचा प्रश्न मार्गी

Tags: ajit pawarbjpCM Devendra FadnavisncppunePune CorporationSinghgad Road Flyoverअजित पवारपुणेपुणे महानगरपालिकाभाजपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसराष्ट्रवादी काँग्रेससिंहगड रोड उड्डाणपूल
Previous Post

पुणे महापालिकेला मिळाले ‘हे’ नवे अतिरिक्त आयुक्त

Next Post

पुण्यात बनावट नोटांचं रॅकेट! पोलिसांनी जप्त केल्या लाखोंच्या बनावट नोटा

News Desk

Related Posts

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
Next Post
पुण्यात बनावट नोटांचं रॅकेट! पोलिसांनी जप्त केल्या लाखोंच्या बनावट नोटा

पुण्यात बनावट नोटांचं रॅकेट! पोलिसांनी जप्त केल्या लाखोंच्या बनावट नोटा

Recommended

नेता ते अभिनेता! अभिजीत बिचुकले लवकरच झळकणार चित्रपटात

February 14, 2024
अजब पत्नीचा गजब कारभार! पतीला सोडून पळाली, मृत म्हणून केले अंत्यसंस्कार; पण सापडली ‘या’ योजनेचा लाभ घेताना

July 4, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved