पुणे : गेल्या अनेक महिन्यांपासून कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले होते. राज्यात अनेक भागात तापमानाने चाळीशी पार केली होती. काही भागातील नागिरकांचा उष्णाघाताने मृत्यूही झाल्याचे पहायला मिळाले आहे. अशातच आता राज्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून अंगाची लाहीलाही झालेल्या नागरिकांना आता लवकरच गारवा अनुभवायला मिळणार आहे.
येत्या १३ मे पर्यंत मान्सून अंदमानात दाखल होणार आहे. त्यामुळे दरवर्षी पेक्षा यंदा ८-१० दिवस आधीच पावसाचं आगमन होणार आहे. निकोबार बेटावर मान्सूच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. हवेचा दाब कमी झाल्याने बेटावर हालचालींना वेग आला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. येत्या १० आणि ११ मे रोजी पुण्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, आज महाराष्ट्रात अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यापासून प्रचंड उन्हाच्या चटक्याने हैराण झालेल्यांना काहीसा दिलासाही मिळाला असता तरीही राज्यभरात अवकाळी पावसाने शेतीपिकांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
-“आमच्या भगिनींचे कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानचा बदला ‘ऑपरेशन सिंदूर’ने घेतला”- हेमंत रासने
-पुण्यात धक्कादायक प्रकार; रिक्षा चालकाने प्रवासी तरुणीला केले अश्लील मेसेज अन् व्हिडीओ कॉल करुन…
-दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘गोकुळ’नं दुधाच्या दरात केली इतक्या रुपयांची वाढ
-सायबर गुन्ह्यात वाढ: ‘सीबीआय’च्या कारवाईची भीती दाखवत महाविद्यालयीन तरुणीची लाखोंची फसवणूक