Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

हुंड्याच्या छळामुळे उच्चशिक्षित महिलेने केली आत्महत्या, सासूविरुद्ध गुन्हा दाखल

by News Desk
June 22, 2025
in Pune, पुणे शहर
सुसंस्कृत पुण्यात आणखी धक्कादायक घटना; हुंडा अन् सासरच्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातील हांडेवाडी येथे सासूकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून एका उच्चशिक्षित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. दीपिका प्रमोद जाधव (वय २९) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी दीपिकाच्या वडिलांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, सासू द्वारका नामदेव जाधव (रा. सातवनगर, हांडेवाडी रस्ता) हिच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपिका आणि प्रमोद जाधव यांचा विवाह आठ वर्षांपूर्वी झाला होता. दीपिकाने कृषी विषयात पदवी प्राप्त केली होती आणि ती एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. तिचा पती शासकीय कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहे. दाम्पत्याला एक मुलगा आहे. मात्र, विवाहानंतर सासू द्वारका हिने दीपिकाला हुंड्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. कमी हुंडा दिल्याचा टोमणा मारत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. तसेच, तिच्याकडे सतत पैशांची मागणी केली. या सततच्या त्रासाला कंटाळून दीपिकाने २० जून रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक विलास सुतार यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. दीपिकाच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे की, सासूच्या असह्य छळामुळेच दीपिकाने टोकाचे पाऊल उचलले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच ही दुसरी घटना समोर आल्याने हुंडा आणि कौटुंबिक छळाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, पुण्यातील कात्रज परिसरातील आंबेगाव येथे आणखी एका धक्कादायक घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. येथे एका महिलेने तिच्या सहा वर्षांच्या मुलाला घेऊन इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तपासात या महिलेलाही कौटुंबिक छळाला सामोरे जावे लागल्याचे समोर आले. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे. या दोन्ही घटनांनी हुंडा आणि कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध कठोर कारवाईची गरज अधोरेखित केली आहे.

महत्वाच्या बातम्या

-लग्नात गाडी दिसली की लगेच विचारा, हुंड्यात मिळालेय का?, हुंडाबळी प्रकरणांवरुन सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

-पुण्यात धक्कादायक प्रकार; मौत्रिणसोबत कारमध्ये बसलेल्या तरुणाला खाकीचा धाक दाखवला अन्…

-पुण्यात व्यावसायिकाने संपवले जीवन, धक्कादायक कारण आले पुढे

-हिंदी भाषा सक्तीबाबत केलेल्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री फडणवीसांना कायदेशीर नोटीस

-‘जात-पात ना धर्म रे माझ्या विठुराया पाशी’; पुण्यातील हा मुस्लिम करतोय वारकऱ्यांची सेवा

Previous Post

लग्नात गाडी दिसली की लगेच विचारा, हुंड्यात मिळालेय का?, हुंडाबळी प्रकरणांवरुन सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

Next Post

पालखी सोहळ्यात चोरांनी भाविकांच्या मोबाइलवर मारला डल्ला

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
Varkari

पालखी सोहळ्यात चोरांनी भाविकांच्या मोबाइलवर मारला डल्ला

Recommended

Sassoon Hospital

ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणला अन् पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला

March 26, 2025
लग्नानंतर पती गे असल्याचं समजलं; तरीही २ वर्षे संसार रेटला, अखेर पीडितेने पोलिसांत घेतली धाव

April 20, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved