पुणे : पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण दलाकडून आज पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये पाकचा हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडल्याची माहिती देण्यात आली. भारत हल्ले करत असल्याचा पाकिस्तानचा दावा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने खोडून काढला आहे. भारत केवळ दहशतवादी कारवायांना प्रत्युत्तर देत असून, यापुढे पाकिस्तानचा दहशतवाद सहन केला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. प्रत्येक हल्ल्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल, असंही स्पष्ट करण्यात आलं. गेल्या ६५ वर्षांपासून सिंधू कराराचं पालन करणं ही भारताची सहनशीलता होती, परंतु आता भारत आपल्या हक्काचं पाणी वापरणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे.
पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताने हे हल्ले यशस्वीपणे परतवून लावला. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्युत्तरादाखल पाकिस्तानच्या लाहोरसह अनेक ठिकाणच्या हवाई संरक्षण यंत्रणा निष्क्रिय करण्यात आल्या. पाकिस्तानने भारतातील १५ शहरांवर हल्ला करण्याचा डाव आखला होता, पण तो पूर्णपणे उधळून लावण्यात आला. याशिवाय, भारताने पाकिस्तानच्या रडार यंत्रणेलाही निष्क्रिय केल्याचं लष्कराने जाहीर केलं आहे.
भारताने केलेल्या या कारवाईची माहिती भारतीय लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्यासह परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. भारताने आपली संरक्षण क्षमता आणि दहशतवादाविरोधातील कठोर भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. यापुढे कोणत्याही प्रकारचा हल्ला खपवून घेतला जाणार नाही, असा निर्वाणीचा इशारा या पत्रकार परिषदेतून पाकिस्तानला देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
-‘आमचा तणाव वाढवण्याचा कोणताही हेतू नाही, पण पाकने तणाव वाढवला तर…’; अजित डोवालांचा इशारा
-तुम्हाला निवडणुका घ्यायच्याच नाहीत का?; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
-“आमच्या भगिनींचे कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानचा बदला ‘ऑपरेशन सिंदूर’ने घेतला”- हेमंत रासने