Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Uncategorized

PMC Election: तीनच्या प्रभागावर फुली, सोळा प्रभागांची रचना हालली! मंत्रालयातल्या उलटफेरीची Inside Story

by News Desk
August 22, 2025
in Uncategorized
Pune Corporation
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

विरेश आंधळकर | पुणे :  पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, हा मुहूर्त देखील हुकला असून निवडणूक आयोगाच्या शंकांचे निरसन सुरू असल्याने एक-दोन दिवस उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महापालिकेच्या माध्यमातून प्रभाग रचना तयार केली जात असताना सत्ताधाऱ्यांकडून हस्तक्षेप झाल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे. यामध्ये विशेषत: भाजप नेत्यांनी आपल्याला अनुकूल तीन सदस्यीय प्रभाग केल्याचा आरोप झाला. परंतु ही प्रभाग रचना नगर विकास खात्याकडे गेल्यानंतर मोठे उलटफेर झाल्याची खात्रीलायक माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.

यंदा प्रथमच राज्य सरकारने नवीन नियमावली आणत महापालिकेने तयार केलेली प्रारूप प्रभाग रचना थेट निवडणूक आयोगाकडे न जाता नगर विकास खात्याकडे घेतली. दोन दिवसांपूर्वी नगर विकास खात्याकडून तपासणी होऊन ही रचना निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली. मात्र हे होत असताना मंत्रालयाच्या स्तरावर महापालिकेकडून तयार करण्यात आलेले तीन सदस्य असणाऱ्या ३ प्रभागांवर फुली मारण्यात आली आहे. तर शेवटचा कात्रज आणि नवीन गावांचा समावेश असणारा पाच सदस्यांचा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

You might also like

एकीची तक्रार तर दुसरीने थेट गुन्हाच दाखल केला! पुण्यात भाजप नगरसेविकेसह पतीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; नेमकं कारण काय?

विधानपरिषद निवडणूक: राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी रस्सीखेच, पार्थ पवारांची भूमिका निर्णायक; युवा चेहऱ्याला संधी मिळणार?

IAS रूबल अग्रवाल पुन्हा ‘लकी’ ठरल्या; CM फडणवीसांकडूनच कोकण विभागीय आयुक्तापदावर आल्या

नव्याने करण्यात आलेला पाच सदस्यांचा प्रभाग तब्बल एक लाख वीस हजारांच्यावर मतदारांचा असणार आहे. तीन सदस्य असणारे ३ प्रभागांची रचना बदलण्यात आल्याने बाजूला असणाऱ्या 16 प्रभागांच्या रचनेवर याचा परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. नव्याने तयार करण्यात आलेला प्रभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला अनुकूल असा तयार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पुण्यात प्रभाग रचना होत असताना मित्रपक्षांना बाजूला ठेवणाऱ्या भाजपासाठी ही धोक्याची घंटा आहे.

कधी जाहीर होणार प्रभाग रचना?

प्रभाग रचना जाहीर करणे आणि सूचना मागवण्यासाठी 22 ते 28 ऑगस्टची मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र आता 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी मुंबईत पाचारण केले होते. हे अधिकारी रात्री उशिरापर्यंत निवडणूक विभागातच होते. मात्र, दिवसभराचे सादरीकरण केल्यानंतरही अर्ध्याच प्रभागांच्या रचनेवर चर्चा झाली असून, शुक्रवारीही दिवसभर ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याने शनिवारी प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

Previous Post

‘दामिनी मार्शल’ला कॉल आला अन् ती म्हणाली, ‘मला खूप टेन्शन आहे, जगायचंच नाही’, पुढे काय घडलं?

Next Post

PMC : प्रभाग रचनेवरुन शिंदे-फडणवीस-पवारांमध्ये रंगणार शीतयुद्ध; नेमकं काय प्रकरण?

News Desk

Related Posts

BJP Pune Corporation
Uncategorized

एकीची तक्रार तर दुसरीने थेट गुन्हाच दाखल केला! पुण्यात भाजप नगरसेविकेसह पतीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; नेमकं कारण काय?

by News Desk
May 6, 2026
विधानपरिषद निवडणूक: राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी रस्सीखेच, पार्थ पवारांची भूमिका निर्णायक; युवा चेहऱ्याला संधी मिळणार?
Uncategorized

विधानपरिषद निवडणूक: राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी रस्सीखेच, पार्थ पवारांची भूमिका निर्णायक; युवा चेहऱ्याला संधी मिळणार?

by Team Local Pune
April 27, 2026
IAS रूबल अग्रवाल पुन्हा ‘लकी’ ठरल्या; CM फडणवीसांकडूनच कोकण विभागीय आयुक्तापदावर आल्या
Uncategorized

IAS रूबल अग्रवाल पुन्हा ‘लकी’ ठरल्या; CM फडणवीसांकडूनच कोकण विभागीय आयुक्तापदावर आल्या

by News Desk
March 28, 2026
निवडणुकीतलं वचन सत्तेत येताच मोडलं, पुण्यात भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही
Pune

निवडणुकीतलं वचन सत्तेत येताच मोडलं, पुण्यात भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

by News Desk
March 14, 2026
आमदार पुत्राच्या उमेदवारीला ब्रेक, कार्यकर्त्याला संधी; पार्थ पवारांचे पुण्यात पहिले धक्कातंत्र
Uncategorized

आमदार पुत्राच्या उमेदवारीला ब्रेक, कार्यकर्त्याला संधी; पार्थ पवारांचे पुण्यात पहिले धक्कातंत्र

by Team Local Pune
March 9, 2026
Next Post
PMC : प्रभाग रचनेवरुन शिंदे-फडणवीस-पवारांमध्ये रंगणार शीतयुद्ध; नेमकं काय प्रकरण?

PMC : प्रभाग रचनेवरुन शिंदे-फडणवीस-पवारांमध्ये रंगणार शीतयुद्ध; नेमकं काय प्रकरण?

Recommended

“जनतेच्या सहभागातून जनतेच्या आशा आकांक्षांना आकार देणारे हे संकल्प पत्र”- माधव भंडारी

“जनतेच्या सहभागातून जनतेच्या आशा आकांक्षांना आकार देणारे हे संकल्प पत्र”- माधव भंडारी

April 16, 2024
आता भाजप आमदारही नाहीत सुरक्षित? शिवीगाळ केली अन् घरात घुसण्याचा प्रयत्न, एकाला अटक

आता भाजप आमदारही नाहीत सुरक्षित? शिवीगाळ केली अन् घरात घुसण्याचा प्रयत्न, एकाला अटक

May 29, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved