नवी दिल्ली | पुणे : भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढत असून पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केले. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला कठोर इशारा दिला आहे. ‘जर पाकिस्तानने गोळीबार केला तर भारत तोफगोळ्यांनी प्रत्युत्तर देईल. ऑपरेशन सिंदूर थांबवले जाणार नसून ते सुरूच राहील’, असे भारताने स्पष्ट केले आहे. अमेरिकेने मध्यस्थी केल्याने भारत-पाककडून शस्त्रसंधीची घोषणा केल्याचे सांगण्यात आले होते मात्र, आता अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे नव्हे, तर भारताने स्वतःच्या अटींवर शस्त्रसंधीची घोषणा केल्याचे समोर आले आहे. या कारवाईने पाकिस्तानच्या दहशतवादी यंत्रणेला दीर्घकालीन हानी पोहोचली आहे.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवादी रचनांना मोठा दणका दिला. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, तसेच नऊ दहशतवादी तळ आणि पाकिस्तानच्या लष्करी पायाभूत सुविधांचा नाश करण्यात आला. २२ एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ही आक्रमक कारवाई केली, ज्यामुळे पाकिस्तानला गंभीर जखमा झाल्या आहेत, ज्या भरून काढण्यास बराच वेळ लागेल.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने आपल्या मित्र राष्ट्रांशी सविस्तर चर्चा केली. ऑपरेशन सिंदूरबाबत कोणतीही गोपनीय माहिती उघड न करता, भारताने सर्व संबंधित देशांना स्पष्ट केले की, यावेळी कठोर कारवाई अटळ आहे. पाकिस्तानने युद्धबंदी आणि अमेरिकेशी चर्चेची विनंती केल्यानंतर, भारताने स्वतःच्या अटींवर युद्धबंदी जाहीर केली. युद्धबंदीपूर्वी, ९ मे २०२५ च्या रात्री, अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी पंतप्रधान मोदींशी संवाद साधला होता.
महत्वाच्या बातम्या
-‘येत्या दीड वर्षात नरेंद्र मोदी फडणवीसांना दिल्लीत घेऊन जाणार अन्…’; कोणी केली भविष्यवाणी?
-पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या अनधिकृत कृत्यांविरुद्ध; जिल्हाधिकारी जितेंद्र डु्डींचा इशारा
-राहुल गांधी यांचा जामीन रद्द करा; सात्यकी सावरकरांच्या वकिलांची मागणी
-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्वाचे निर्णय; राज्यात बड्या अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या कॅन्सल