पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊसला सुरवात झाली असून राज्यात अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस तर काही भागात अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. आज मुंबई, पुणे आणि काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून पुणे शहरात आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास पावसाचा चांगलाच सडाका झाला.
पुणेकरांना गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमट उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. पुढील ४ दिवसांत कमाल तापमानात थोडी घट होण्याची शक्यता असून, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहराला पुढील चार दिवसांसाठी ‘यलो ॲलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मुंबईसाठी मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांसाठी ‘यलो ॲलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर, ठाणे आणि दक्षिण कोकणातही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, या भागांसाठीही ‘यलो ॲलर्ट’ देण्यात आला आहे. हवामान विभागाने काल (सोमवार) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत निकोबार बेटांवर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे तिथे काही तासांतच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सोमवारी (१२ मे) सायंकाळी राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. १३ आणि १४ मे रोजीही राज्यात विजांच्या कडकडाटासह वळिवाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूरच्या घाट परिसरातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
-लाडक्या लेकीच हुशार! दहावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी
-पुण्यात आरटीओची मोठी कारवाई; ३४ हजार बेशिस्त वाहनचालकांना दणका, लाखो रूपयांचा दंड वसूल
-मान्सून निकोबार बेटावर दाखल झालाय; आपल्याकडे कधी पोहचणार?
-#ऑपरेशन_सिंदूर सुरुच! इट का जवाब पत्थर से, भारताचा पाकला कडक इशारा
-‘येत्या दीड वर्षात नरेंद्र मोदी फडणवीसांना दिल्लीत घेऊन जाणार अन्…’; कोणी केली भविष्यवाणी?