पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मिरमधील पहगाम येथे दहशतवादी हल्ल्यात २७ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात होता हे उघड झाल्यानंतर भारताने पाकला जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर भारत-पाकिस्तान युद्ध सुरु झालं. जवळपास ३ ते ४ दिवस दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थीती होती. अशातच तुर्कीने देखील पाकिस्तानला पाठिंबा दिला.
भारतासोबतच्या अलिकडच्या तणावादरम्यान तुर्कीने पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्यानंतर, पुण्यातील स्पाइस अँड ड्राय फ्रूट्स असोसिएशनने तुर्की येथून जर्दाळू आणि हेझलनट आयातीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. २ दिवसांपूर्व पुणे मार्केटने तुर्कीवरुन येणाऱ्या सफरचंदाला बंदी घातली आहे. त्यानंतर आता तुर्कीवरुन भारतीय बाजारामध्ये येणाऱ्या जर्दाळू आणि हेजलनट या ड्राय फ्रुट्सच्या आयतीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे.
तुर्कीच्या सफरचंदांवर बॅन तुर्की म्हणत व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे तुर्की सफरचंद बाजारातून गायब झाली आहेत. इराणमधून येणाऱ्या सफरचंदांचे दर वाढले आहेत. घाऊक बाजारात 10 किलो सफरचंदामागे 200 ते 300 रुपये, तर किरकोळ बाजारात प्रति किलो 20 ते 30 रुपये दराने वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
-SSC: शिक्षणाला कशाचंच बंधन नसतं; कचरा वेचणाऱ्या प्रियंका कांबळे दहावीत उत्तीर्ण
-फक्त नावालाच स्पा, बाप-लेकाचा बाणेरमध्ये वेश्या धंदा, पोलिसांनी टाकले दंडुके
-राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपक मानकरांनी दिला शहराध्यक्षपदाचा राजीनामा; पत्रात नेमकं काय म्हणाले?
-गजा मारणेची ढाब्यावरची मटण पार्टी पोलिसांना पडली महागात; ३ पोलिसांचे निलंबन, नेमकं काय प्रकरण?
-SSC Result: महापालिकेची हायटेक शाळा; राखली शंभर टक्के निकालाची परंपरा!