पुणे : मागील काही वर्षात शहरात कमी वेळात अधिक पाऊस पडण्याचा नवीन ट्रेंड दिसून येत असून या पार्श्वभूमीवर पूरस्थिती टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाला निर्देश दिले असून कामे वेगाने आणि दर्जेदार करावीत, असे निर्देश महापालिका प्रशासनाला देत मान्सूनपूर्व कामासाठी नियुक्त केलेले ठेकेदार रिझल्ट देत नसतील, तर त्यांना काळ्या यादीत टाकावे. तसेच ठेकेदार किंवा अधिकारी जे जबाबदार असतील त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशा सूचना केल्याची माहिती पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
“चेंबर साफसफाई, अतिक्रमण काढणे, नाले रुंदीकरण आदी कामाचा आढावा घेण्यात आला. पावसाने कुठे पाणी साठून नागरिकांना त्रास सहन करावा लागतो त्या जागेवर उपाययोजना करण्याच्या सूचना मनपाला दिल्या आहेत. पुण्यात ८७५ किलोमीटरचे एकूण नाले आहे. त्याबाबत सफाई तपासणी मनपाकडून करण्यात येत आहे. पावसाळापूर्व कामात सुसूत्रता येण्यासाठी सर्व विभागाकडून एकत्रित काम केले जाईल. नालेसफाईचे यंदा २३ टेंडर मनपाने काढली असून पावसाळी कामाबाबत १५ टेंडर काढून कामे करण्यात येत आहे. जे ठेकेदार कामाची निविदा घेऊन प्रत्यक्ष काम करत नाही, अशा तक्रारी काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत. यापुढे अशी गोष्ट कुठे दिसल्यास संबंधित ठेकेदारांना काळया यादीत टाकले जाईल. शिवाय ठेकेदार किंवा अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येणार”, असे मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट सांगितले आहे.
‘सन २०१९ मध्ये आंबील ओढा येथे पूर येऊन मोठी आपत्ती आली होती. त्यानंतर उपाययोजना काम करून कात्रज ते दत्तवाडीदरम्यान नाले दुरुस्ती आणि रुंदीकरण करण्यात आल्याने परत काही अडचण आली नाही. पुण्यात नगरसेवक नसले तरी मनपात आमदार, खासदार लक्ष्य देत असून समन्वयाने काम करण्याचे ठरले आहे. पुण्यात मान्सूनपूर्व कामाचा वॉर्ड निहाय रिपोर्ट करून त्याचा एकत्रित अहवाल करण्याच्या सूचना दिल्या आहे. प्रत्येक जागी कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करण्यास देखील सांगितली आहे. जे नेमून दिलेली कामे करत नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट सांगितले आहे.
पुण्यात आधी ११७ क्रॉनिक स्पॉट होते. त्यानंतर २२ गावे समाविष्ट झाल्यावर आता ही संख्या २०१ वर पोहोचली आहे. त्यापैकी ११७ स्पॉटचे काम पूर्ण झाले आहे. त्याजागी नालेसफाई झाली असून उर्वरित ८४ जागांवर काम सुरू आहे. ती कामे पावसाळापूर्व पूर्ण होतील. इतर जे ३९ स्पॉट कामे यंदा पूर्ण होऊ शकणार नाही, त्याठिकाणी तात्पुरते उपाययोजना करण्यात येत आहे. नागरिकांचे हाल होऊ नये, याची दखल प्रशासनाने घ्यावी अशी सूचना महापालिकेला दिल्या आहे.
आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी केल्या जाणाऱ्या कामाचा आढावा महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्यासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत घेतला. यावेळी आमदार भीमराव तापकीर, आमदार हेमंत रासने, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
-भाजप खासदार मेधा कुलकर्णींना स्वपक्षीय नेत्याची धमकी, म्हणाले “आधी तिकीट कापलं आता…”
-रक्षकच निघाले भक्षक! वाघोलीत पोलिस अधिकाऱ्यानेच केला जमीन घोटाळा, चौघांवर गुन्हा दाखल
-पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगचा थरार; भररस्त्यात टोळक्याचा तरुणावर हल्ला
-छत्रपती संभाजी महाराज जयंती: पालिका प्रशासनाची उदासीनता, शंभूप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी