पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय २४) हिने आत्महत्या केल्याची घटना घडली अन् राजकारणात मोठी खळबळ उडाली. वैष्णवीच्या हत्येचा बनाव रचला आणि तिने आत्महत्या केली असल्याचे पोलिसांना भासवले. या घटनेवरुन राजकारणातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून होणाऱ्या अशा प्रकारच्या कृत्यावर संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली त्यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
काय आहे चित्रा वाघ यांचं ट्वीट?
दोन वर्षांपूर्वी लग्न आणि अवघ्या २३ व्या वर्षी एका नवविवाहित मुलीने आपलं आयुष्य संपवलं – कारण हुंड्याची छळवणूक…! दुर्दैवाने ही घटना राष्ट्रवादी नेता राजेंद्र हगवणे यांच्या घरात घडलेली आहे. वैष्णवी ही हगवणेंची सून होती. या केसमध्ये मी स्वतः पोलिसांशी बोलले असून नवरा सासू नणंद अटकेत आहेत. दिर आणि सासरा राजेंद्र हगवणे फरार आहे ते ही लवकरच पकडले जातील. कोणताही पक्ष…कोणताही नेता.. कुणाचंही नातं गुन्हेगारांना कसलीही सूट नाहीचं..!! लक्षात ठेवा हे देवाभाऊंचे राज्य आहे… इथे गुन्हेगाराला माफी नाहीच, असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली. मात्र वैष्णवी शशांक हगवणे हिने आत्महत्या केली नसून तिची हत्या केल्याचे उघडकीस आले. तिच्या शरीरावरील मारहाणीच्या खुणा आणि गळ्याभोवती असलेल्या स्पष्ट खुणा पहाता ही हत्या असल्याचा संशय आलाच होता. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला आणि बावधन पोलिसांनी डॉक्टरांचा अहवाल प्राप्त करुन पुढील तपास सुरु केला. फॉरेन्सिक अहवाल, कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब, तसेच आरोपींची पार्श्वभूमी यांचा अभ्यास करून मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सुनेच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिचे सासरे राजेंद्र हगवणे यांनी मुलाला घेऊन फरार झाले आहेत. दरम्यान, पोलिसांनी मृत वैष्णवीच्या पती, सासू आणि नणंद यांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना २१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच पोलीस राजेंद्र हगवणे यांचा शोध घेत आहेत. अशातच चित्रा वाघ यांनी केलेल्या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळाच मोठी चर्चा सुरु झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
-नाव ‘निद्रा बॉडी स्पा’ पण आत भलताच धंदा; पोलिसांनी छापा टाकताच…
-पुणे आयडॉल स्पर्धा: ‘गायकांनी कालानुरूप बदल स्वीकारले पाहिजेत’; पं. अजय पोहनकरांचं आवाहन
-एरव्ही पिक्चरमध्ये बोल्ड सीन आला की बंदी घालणाऱ्या चाकणकर…; शालिनी ठाकरें आक्रमक, नेमकं काय प्रकरण?
-पीएमपी प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; उशिरा तिकीट काढाल तर होणार कारवाई