पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. वैष्णवी हगवणे यांची हत्या नसून त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला. तसेच त्यांना हुंड्यासाठी छळलं जात होतं, मारलं जात होतं, असंही पोलिसांनी स्पष्ट सांगितलं आहे. हगवणे यांची सून वैष्णवी हिचा छळ केल्याचं पोलिस तपासात उघड झालं मात्र, आता त्यांच्या मोठ्या सुनेबाबतही महत्वाची अपडेट समोर आली आहे.
कपडे फाटेपर्यंत मोठ्या सुनेलाही केली होती मारहाण
राजेंद्र हगवणेंच्या मोठ्या सुनेने देखील मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात छळवणुकीची आणि अंगावरचे कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली होती. अशी तक्रार मोठ्या सुनेने पोलिसांत दिली होती. त्या प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला होता. मात्र पोलिसांनी त्यावेळी कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यानंतरही मोठ्या सुनेला कायम त्रास देण्यात आला. या त्रासाला कंटाळून मोठी सून घर सोडून निघून गेली. मोठी सून तर या त्रासातून सुटली पण लहान सून वैष्णवीला मात्र यामध्ये आपला जीव गमावावा लागला.
वैष्णवी हगवणे यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीचा पती, सासू-सासरे नणंद आणि दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून वैष्णवी यांना क्रूर वागणूक दिली. तिच्या मृत्यूस कारणीभूत झाले, तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळून आले. या प्रकरणात सध्या हुंडाबळी व मृत्यूस कारणीभूत या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याात आला आहे. व्हिसेरा राखून ठेवला असून तपासात काही निष्पन्न झाल्यास त्यानुसार कलमवाढ करण्यात येईल, अशी माहिती बावधन पोलिसांनी दिली. राजेंद्र हगवणे , त्यांची पत्नी आणि मुलावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच राजेंद्र हगवणे फरार झाले आहेत.
प्रेमविवाह तरीही शशांक वैष्णवीच्या चारित्र्यावर घ्यायचा संशय
अजित पवार गटाचे मुळशीतील पदाधिकारी राजेंद्र हगवणे सून वैष्णवीच्या आत्महत्येनंतर फरार आहे. वैष्णवीचा हुंड्यासाठी अमानुष छळ केल्याचा सासरे राजेंद्र हगवणेसह सासू, पती, दिर आणि नणंद यांच्यावर आरोप आहे. प्रेम विवाहावेळी 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी देण्यात आली. तरी जमीन खरेदीसाठी 2 कोटींच्या मागणीचा तगादा लावला तसेच पती शशांक हा चारित्र्यावरून संशय ही घेत होता.
राजेंद्र हगवणे हे अजित पवारांचे निकटवर्तीय असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही असा दावा अनेकांकडून करण्यात आला. मात्र हा दावा साफ चुकीचा असून पोलिसांचा तपास सुरु असून राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगी (मृत वैष्णवीचा दीर) यांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. राजेंद्र हगवणेंच्या शोधात पोलिसांची तीन पथकं रवाना केल्याची माहिती बावधन पोलिसांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
-महिन्यात एक नाही दोन नाही तर तब्बल २५ पुरुषांशी केलं लग्न, अखेर ‘त्या’ रात्री पितळ उघड पडलंच
-काँग्रेसमधून आलेल्या धंगेकरांची शिवसेनेत बढती; एकनाथ शिंदेंनी सोपवली मोठी जबाबदारी
-भुजबळ मंत्रिमंडळात! भाजपचा राजकीय डाव की अजितदादांचा नाईलाज?
-शरद मोहोळच्या खूनाचा बदला घेण्याचा प्लॅन फिस्कटला; पोलिसांनी ‘त्या’ सराईताला ठोकल्या बेड्या
-भुजबळांना मंत्रिपद, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा काही थांबेना; नेमकं काय राजकारण?