पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणेने आपलं आयुष्य संपवलं. या प्रकरणामध्ये हगवणे कुटुंबाचा हुंड्यासाठी सुनांशी केलेले घृणास्पद कृत्य समोर आलं आहे. या प्रकरणाने शहरासह संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे. अशातच या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. वैष्णवीच्या सासरच्या मंडळींनी तिला हुंड्यासाठी छळल्याचा आरोप झाला असताना, आता तिची मोठी जाऊ मयुरी जगताप हगवणे हिनेही हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत.
हगवणे कुटुंबाने मयुरीला कसा त्रास दिला?
२०२२ मध्ये तिचे सुशील हगवणे यांच्यासोबत लग्न झाले होते. लग्नानंतर तिला सासू लता, नणंद करिश्मा आणि दीर शशांक यांच्याकडून सतत छळ सहन करावा लागला. माझी सासू माझे लाड करायची, तर नणंद तिला अडवायची आणि सासूला म्हणायची की, ‘तू का लाड करतेस?’ तू त्यांच्यासोबत असं करू नको. पण या सर्व गोष्टीमध्ये त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजे सुशिल हगवणेंनाही मारहाण झाली. कारण सुशिल नेहमी माझी बाजू घ्यायचे. आम्ही दीड वर्ष झालं, वेगळं राहत होतो. माझ्या नंदेने आणि दिराने माझ्या चारित्र्यावर संशय घेतला. आम्हाला घर नाही मिळू दिलं. दीर आणि सासरे माझ्या नवऱ्याला जमीन मिळू द्यायचे नाही. आम्ही त्यांच्या पाया पडावं, असं त्यांना वाटायचं. पण आम्ही नाही गेलो, असं सांगत मयुरी हगवणेंनी सासरच्या मंडळीच्या कृत्याचा पाढा वाचला.
“मी नोव्हेंबरला त्यांची तक्रार दिली होती. 8:30 वाजता मी पौड पोलीस स्टेशनला गेले. पण पोलिसांनी 9:30 पर्यंत काहीच तक्रार घेतली नाही. तक्रार करू नका असं म्हणत तिथल्या महिला अधिकाऱ्यांनी दबाव आणला. नंतर फरार झाले आणि माझ्या भाऊ आणि आईविरोधात तक्रार केली आहे”, असेही सांगितले आहे.
“वैष्णवीसोबत मला कुणी बोलू द्यायचे नाही. तिला बोलायचंच नाही असं म्हणायचे. माझे मिस्टर (सुशील) म्हणायचे वैष्णवीला त्रास देऊ नका, तेव्हा सासू म्हणायची तू शांत बस. वैष्णवीला मारण्यात आल्याचं घरातल्या काम करणाऱ्या लोकांनी सांगितलं. वैष्णवी सासऱ्याकडे, दीराकडे बघते असं म्हणत शशांत हंगवणे तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. तिला त्रास नको म्हणून आम्हीही कधी बोलायचो नाही”, असे मयुरीने सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
-वैष्णवी हगवणे प्रकरणी अजितदादांनी अखेर उचललं पाऊल; राजेंद्र हगवणेंवर केली ‘ही’ मोठी कारवाई
-चिमुकली टीव्ही बघायला गेली अन् नराधम शेजाऱ्याने संधी साधली, शेजारधर्माला काळिमा फासणारी घटना
-राज्याला अवकाळी पावसाचा फटका; मुख्यमंत्र्यांनी शेकऱ्यांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
-‘तीच माझ्या आयुष्यातील मोठी चूक’; वैष्णवीने मैत्रिणीला नेमकं काय सांगितलं? ऑडिओ क्लीप व्हायरल