पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे अखेर बावधन पोलिसांनी अटक केली आहे. पुणे येथील वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांनी अखेर तिचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक केली आहे. वैष्णवीने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर ७ दिवस फरार असलेल्या या दोघांना बावधन पोलिसांनी २३ मे रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास स्वारगेट परिसरातून ताब्यात घेतले. यापूर्वी वैष्णवीचा पती शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांना अटक झाली होती. या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडाली असून, दिल्लीच्या महिला आयोगानेही याची दखल घेतली आहे.
पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, वैष्णवीच्या आत्महत्येमागे सासरच्या छळाचे गंभीर आरोप आहेत. तपासादरम्यान, हगवणे कुटुंबाकडून वैष्णवीच्या मोठ्या सुनेचाही छळ झाल्याचे धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व पुरावे गोळा केले असून, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास पुढे सुरू आहे. लवकरच या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.
वैष्णवी हगवणे प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी सहा पथके तैनात केली होती. फरार असलेल्या राजेंद्र आणि सुशील यांना शोधण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. अखेर स्वारगेट येथून या दोघांना अटक करण्यात यश आले. या प्रकरणाने सामाजिक स्तरावर मोठी चर्चा निर्माण केली असून, महिलांवरील अत्याचार आणि कौटुंबिक छळाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला गेला आहे.
महत्वाच्या बातम्या
-पुणे पुन्हा हादरलं; हगवणे प्रकरण ताजं असतानाच २२ वर्षीय तरुणीचा हुंडाबळी
-अन् वैष्णवीचं बाळ आजी-आजोबांकडं पोहचलं…अजितदादांच्या दोन महिला नेत्यांनी केली मोहीम फत्ते