पुणे : आम आदमी पार्टी (आप) पुण्यात महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल १६ जूननंतर पुण्यात येण्याची शक्यता आहे. निवडणूक नियोजनासाठी त्यांचा हा दौरा होणार असल्याचे समजते. पक्षाने प्रभागनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या काही वर्षांत आपने पुण्यात चांगले संघटन उभे केले आहे. रिक्षा चालकांसाठी स्वतंत्र संघटना स्थापन केली असून, अन्य सामाजिक वर्गांमध्येही कार्यकर्ते सक्रिय आहेत. विशेषतः सुशिक्षित तरुणांना पक्षाने आकर्षित केले असून, त्यांच्यामार्फत विविध क्षेत्रांत काम सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत आपने इंडिया आघाडीचा घटक पक्ष म्हणून काम केले. विधानसभा निवडणूक लढवण्याची कार्यकर्त्यांची इच्छा होती, पण पक्षाने तसा निर्णय घेतला नव्हता.
महापालिका निवडणुकीसाठी मात्र पक्षाने आधीपासून तयारी सुरू केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोणतीही अडचण येणार नाही, असे पक्षाचे पदाधिकारी सांगतात. राज्य कार्याध्यक्ष अजित फाटके आणि प्रचारप्रमुख रंगा राचुरे याबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार आहेत. सध्या निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांच्या प्रभागात बैठका घेतल्या जात आहेत. असंघटित कामगार आणि स्थानिक समस्यांवर लक्ष देण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत.
पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पुण्यात येऊन कार्यकर्त्यांना भेटावे आणि मार्गदर्शन करावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. १६ जूननंतर त्यांचा दौरा होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत शहरातील कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याचे काम सुरू आहे, असे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
-अहमदाबादमध्ये प्रवासी विमान नागरी वस्तीत कोसळलं, २४२ प्रवाशांना घेऊन टेकऑफ केलं अन्…
-विवाहसंस्थेच्या नावाखाली उच्चशिक्षित तरुणीसोबत प्रेमाचं नाटक केलं अन् तिघांनी मिळून… पुढे काय झालं?
-पुणेकरांची गोष्टच भारी! दक्षिण आफ्रिकेत जगप्रसिद्ध मॅरेथॉनमध्ये उंचावली देशाची शान
-फिरायला जाण्याचा प्लान करण्याआधी ही बातमी वाचाच, ‘या’ महत्वाच्या ठिकाणांवर बंदी
-पालिकेची निवडणूक होणार चार सदस्यीय प्रभाग रचनेत; ४२ प्रभागांत किती नगरसेवक?