Monday, July 20, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पालिकेची निवडणूक होणार चार सदस्यीय प्रभाग रचनेत; ४२ प्रभागांत किती नगरसेवक?

by News Desk
June 11, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Pune Corporation
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे महानगरपालिकेची निवडणूक ४ सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होणार आहे. २०११ च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना करावी, असा आदेश राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने दिला आहे. त्यानुसार, पुण्यात ४२ प्रभाग असतील आणि नगरसेवकांची संख्या १६५ राहील. पुणे महानगरपालिकेची मुदत १४ फेब्रुवारी २०२२ रोजी संपली. त्यापूर्वी प्रभाग रचनेसाठी एक, दोन किंवा तीन सदस्यीय प्रभागांवर चर्चा झाली होती. अखेर, महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला आणि त्यानुसार प्रभाग रचना जाहीर केली. यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले.

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुणे महानगरपालिकेची निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगरविकास विभागाने पुणे महानगरपालिकेसाठी चार सदस्यीय प्रभाग रचना तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई महानगरपालिका वगळता इतर सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार होतील. २०११च्या जनगणनेनुसार पुणे महानगरपालिकेत समाविष्ट ३२ गावांसह एकूण लोकसंख्या ३४ लाख ८१ हजार ९०० होती. त्यानुसार ४२ प्रभाग आणि १६५ नगरसेवक असतील.

You might also like

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

प्रभाग रचनेची प्रक्रिया

महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करून पालिका आयुक्तांनी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करावी. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेला अधिकारी प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देईल. मग आयुक्तांनी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करावी. या रचनेवर प्राप्त हरकती आणि सूचनांवर राज्य सरकारने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यामार्फत सुनावणी होईल. सुनावणीनंतर अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर केली जाईल. आयोगाने मान्यता दिल्यानंतर आयुक्त अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करतील.

प्रभाग रचनेची मार्गदर्शक तत्त्वे

प्रभाग रचना उत्तर दिशेपासून सुरू करावी, मग ईशान्य, पूर्व, पश्चिम आणि शेवटी दक्षिणेकडे सरकावे. प्रभागांना याच क्रमाने क्रमांक द्यावेत. प्रभाग रचना करताना भौगोलिक सलगता राखावी. सीमारेषा ठरवताना रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, फ्लायओव्हर यांसारख्या नैसर्गिक मर्यादांचा विचार करावा. एका इमारती, चाळी किंवा घराचे विभाजन दोन प्रभागांत होणार नाही याची काळजी घ्यावी. सर्व जागा कोणत्या ना कोणत्या प्रभागात समाविष्ट झाल्या पाहिजेत. सीमांचे वर्णन करताना रस्ते, नाले, नद्या, सिटी सर्व्हे नंबर यांचा उल्लेख करावा. वस्त्यांचे शक्यतो विभाजन टाळावे.

प्रभाग रचना समिती

प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन होईल. यात स्थानिक स्वराज्य संस्थेची माहिती असलेला अधिकारी, प्रभाग रचनेशी संबंधित अधिकारी, नगर रचनाकार, संगणक तज्ज्ञ आणि आवश्यकतेनुसार इतर अधिकाऱ्यांचा समावेश असेल, असे आदेशात नमूद आहे.

महत्वाच्या बातम्या

-शिंदेसेना पुण्यात वेगळी चूल मांडणार? धंगेकरांकडून एकट्याने लढण्याचा आग्रह, शिंदेंचा निर्णय काय?

-भाजप नेत्याचा प्रताप; आधी पालिकेच्या महिला अधिकाऱ्याला त्रास, आता सहकाऱ्यांकडून अधिकाऱ्याचे कपडे काढण्याची भाषा

-सुसंस्कृत पुण्यात आणखी धक्कादायक घटना; हुंडा अन् सासरच्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

-लग्न केलं अन् १३चं दिवसात संसार उद्ध्वस्त, ‘राजा’ची सोनम निघाली बेवफा

-गणेशोत्सवाबाबत उच्च न्यायालयाच्या महत्वाचा निर्णय; मूर्तिकार अन् मंडळाचा मार्ग झाला मोकळा

Tags: Coprorationpuneपुणेमहापालिका निवडणूक
Previous Post

शिंदेसेना पुण्यात वेगळी चूल मांडणार? धंगेकरांकडून एकट्याने लढण्याचा आग्रह, शिंदेंचा निर्णय काय?

Next Post

फिरायला जाण्याचा प्लान करण्याआधी ही बातमी वाचाच, ‘या’ महत्वाच्या ठिकाणांवर बंदी

News Desk

Related Posts

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

by News Desk
June 30, 2026
Next Post
Lonawala

फिरायला जाण्याचा प्लान करण्याआधी ही बातमी वाचाच, 'या' महत्वाच्या ठिकाणांवर बंदी

Recommended

पुण्यात महायुतीचा भव्य मेळावा; मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्रीही रिंगणात उतरले

पुण्यात महायुतीचा भव्य मेळावा; मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्रीही रिंगणात उतरले

April 11, 2024
लाखोंच्या गर्दीच नियोजन अन् मोदींसाठी मोहोळांच्या संकल्पनेतून खास ‘दिग्विजय पगडी‘! संकल्प सभेसाठी भाजपची तयारी

लाखोंच्या गर्दीच नियोजन अन् मोदींसाठी मोहोळांच्या संकल्पनेतून खास ‘दिग्विजय पगडी‘! संकल्प सभेसाठी भाजपची तयारी

April 29, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved